Take a fresh look at your lifestyle.

ओम – स्वीटू पुन्हा येणार एकत्र? अखेर उघड झाले ‘त्या’ दिवसाचे सत्य; मालिकेने घेतले रंजक वळण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ हि मालिका सुरु झाल्यानंतर फार कमी काळात प्रेक्षकांची लाडकी मालिका झाली. या मालिकेतील ओम आणि स्वीटू तर प्रेक्षकांना इतके भावले होते कि सोशल मीडियावर हि जोडी सात चर्चेत असायची. ओम आणि स्वीटू यांचे लग्न देखील होणार होते. दरम्यान या मालिकेची लोकप्रियता अत्यंत उच्चांकावर होती आणि इतक्यात मालिकेची पसंती पूर्णपणे उतरली. याचे कारण म्हणजे मालिकेतील स्वीटू आणि मोहितचे लग्न. ओमला सोडून स्वीटूचे मोहितसोबत लग्न होणे प्रेक्षकांना मान्य झाले नाही आणि हि मालिका प्रचंड ट्रॉल झाली. यानंतर स्वीटूला अद्याप या दिवसाचे सत्य माहित नव्हे. पण आता मालिका एक वेगळं वळण घ्यायला तयार आहे.

या मालिकेतील ओम आणि स्वीटू पुन्हा एकदा एकत्र येण्याची खात्री सर्वांना वाटू लागली आहे. आता मालिकेत ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे. या मालिकेचा बहुप्रतीक्षित क्षण असणारा नवाकोरा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. स्वीटूचे लग्न मोहितसोबत झाल्यानंतर ही मालिका ट्रोल झाली होती आणि अजूनही होत आहे. खरतर आपली लाडकी जोडी अश्याप्रकारे वेगळी होतेय हे कुणालाच मान्य नव्हते. पण यानंतर आता अखेर स्वीटूला सत्य कळणार आहे. ते हि तिच्या दादांकडून.

होय. लग्नानंतर स्वीटू मोहितसोबत ओमच्याच घरात राहत आहे. स्वीटूला हे लग्न मान्य नव्हते पण तिने सर्व काही मान्य करून सुरळीत चालू असल्याचा चांगलाच आव आणला होता. घरच्यांनाही ते सगळं काही खरं वाटत असताना दुसरीकडे ओम लग्नाच्या दिवशी कुठे होता याचे खरे कारण स्वीटूला अद्याप माहित नव्हते. मात्र आता लग्नाच्या दिवशी जे काही घडले त्याबद्दल स्वीटूला तिच्या वडिलांकडून सगळं सत्य समजले आहे. ओम तिच्यावर किती प्रेम करतो हेदेखील तिला समजले आहे. त्यात प्रोमोमध्ये स्वीटूच्या हातात मंगळसूत्र दिसत आहे अर्थात मोहीतचा पत्ता कट झाल्याचे दिसते आहे. पण या सगळ्यात ओम शहर सोडून कायमचा जातोय. त्यामुळे आता सगळ समजल्यानंतर स्वीटू ओमला थांबवण्यासाठी गेलीये पण ती ओमला थांबवू शकेल का? आता हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर मालिकेचा पुढील भाग नक्की पहा.