Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनावर ठाकरे बंधूही हळहळले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी आपल्या अभिनयाचे गाजवणारे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. हि बातमी सर्वत्र पसरताच शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ते ९३ वर्षाचे होते. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबद्दलची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली. यानंतर चित्रपट सृष्टी आणि राजकीय स्तरावर शोककळा पसरली आहे. रमेश देव यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी आणि नेते मंडळींनी शोक व्यक्त केला आहे. ठाकरे बंधुंचाही समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. तर राज ठाकरे यांनी रमेश देव यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत कुटुंबियांना धीर दिला आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शोकाकुल संदेश देणारे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी रमेश देव याना श्रद्धांजली देताना लिहिले आहे कि, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे. त्यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कला क्षेत्राची सेवा केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान रमेश देव यांच्या पार्थिवावर काहीच वेळात अंत्यसंस्कार पार पडतील. अश्या दुःखद प्रसंगी रमेश देव यांचे चिरंजीव अभिनेता अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनव यांना धीर देण्यासाठी अनेक कलाकार मंडळी आणि राजकीय नेते मंडळींनी उपस्थिती दर्शविली आहे. यामध्ये मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यांनी रमेश देव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत देव कुटुंबियांना धीर दिला. या ठिकाणी दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर, अभिनेता चेतन दळवी आणि इतर अनेक कलाकार मंडळी उपस्थित आहेत.