Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हॅपी बर्थडे शालीन भनोत; BIGG BOSS’च्या चिकन लव्हर स्पर्धकाची अशी आहे रिअल लाईफस्टाइल

Adarsh Patil by Adarsh Patil
November 16, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shalin Bhanot
0
SHARES
91
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील बिग बॉस 16 हा सध्या अत्यंत चर्चेचा विषय आहे. या सिजनमध्ये अनेकदा राडे, भांडण, बाचाबाची आणि अगदी मारामारी सुद्धा पहायला मिळाली. पण या सगळ्यात आपल्या खाण्यापिण्यावर नीट लक्ष देणारा शालीन भनोत मात्र चांगलाच चर्चेत राहिला.

View this post on Instagram

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

मेडिकल कंडिशननुसार आपल्याला दिवसभरात किती प्रोटीन लागतं हे तो वारंवार बिग बॉसला सांगताना दिसला. सतत चिकनची डिमांड केल्यामुळे सोशल मीडियावरही चिकन शालीन म्हणून ट्रेंड झाला. पण आजचा दिवस खास आहे. आज शालीनचा 40’वा वाढदिवस आहे. तर आज आपण त्याच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील सवयी आणि घटनांविषयी जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

अभिनेता शालीन भनोत हा मूळ मध्य प्रदेशचा आहे. दिनांक 15 नोव्हेंबर 1982 साली त्याचा जबलपूरमध्ये जन्म झाला. शालीन एक टीव्ही अभिनेता आहेच शिवाय काही चित्रपटांमध्येही त्याने सहाय्यक भूमिका केल्या आहेत. अभिनेता शालीन भनोत याने 2009 साली टीव्ही अभिनेत्री दलजित कौर सोबत लग्न केले होते. मात्र कौटुंबिक वाद विवादांमुळे त्यांचं लग्न काही टिकू शकलं नाही. दलजितने शालीनवर हुंडा मागितल्याचा आरोप केला होता.

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR ੴ (@kaurdalljiet)

शिवाय शालीनकडून तिला मारहाण झाल्याचेही तिने सांगितले होते. 2015 साली तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. शालीन आणि दलजित यांना एक मुलगा देखील आहे. ज्याचं नाव जयदन आहे. 2016 मध्ये बॉम्बे हायकोर्टाने या केसचा निकाल देत मुलाची कस्टडी दलजितला दिली. मात्र शालिनला त्याला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

अशी लाईफ स्टोरी असलेल्या शालिनला मानहानीसह पॅनिक अटॅक, मेंटल ट्रॉमासारख्या त्रासांना सामोरे जावे लागले. गेल्या काही काळात त्याने स्वतःला सावरले असून आता तो एक उत्तम व्यक्ती म्हणून आयुष्य व्यतीत करत आहेत. खूप मोठ्या गॅपनंतर यावेळी तो बिग बॉसच्या 16 व्या सिजनमध्ये दिसतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

जिथे त्याचे सूर टीना दत्तासोबत जुळतील अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे. शालीनच्या लाइफस्टाइल बद्दल बोलायचं झालं तर तो अतिशय चैनीने जगणारी व्यक्ती आहे. त्याच्याकडे Audi A 6 चारचाकी तर Harley Davidson आणि Royal Enfield Triumph दुचाकी आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

माहितीनुसार, आधीच्या काळात शालीन पूर्ण शाकाहारी होता. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्याच्या डाएटमध्ये केल्या गेलेल्या बदलांमुळे त्याला मांसाहारी व्हावे लागले. त्याला कसरत करणे, वाचन करणे आणि फिरायला जाणे फार आवडते. त्याचा फेव्हरेट अभिनेता हृतिक रोशन तर फेव्हरेट अभिनेत्री कॅटरिना कैफ आहे.

View this post on Instagram

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

त्याला क्रिकेट पहायला आणि खेळायला प्रचंड आवडत. महेंद्र सिंग धोनी त्याचा फेव्हरेट भारतीय क्रिकेट पटू आहे. शालीनच्या कमाईबद्दल बोलायचं तर, तो प्रत्येक एपिसोडसाठी 80,000/- रुपये घेतो. त्याचं नेटवर्थ 15करोडच्या आसपास आहे. सोशल मीडियाबद्दल बोलायचं तर तो सर्वाधिक इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. जिथे त्याला 400K लोक फॉलो करतात. शिवाय फेसबुकवर त्याला 10K लोक फॉलो करतात आणि ट्विटरवर 5K लोक फॉलो करतात.

Tags: Bigg Boss 16 ContestantInstagram PostLifestyleShalin BhanotTV Actorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group