Take a fresh look at your lifestyle.

संजू बाबाच्या वाढदिवसाचं चाहत्यांना मिळालं खास गिफ्ट; KGF2 मधील लूक केला शेअर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात अभिनेता संजय दत्त आज (२९ जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत. तर संजू बाबाने आपल्या चाहत्यांना एकदम गिफ्टच देऊन टाकले. गिफ्ट म्हणजे संजय दत्तने त्याच्या आगामी ‘केजीएफ: चॅप्टर 2’ या चित्रपटाच्या खतरनाक लूकसह आपले नवीन पोस्टर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. यात संजय दत्त खूपच हटके लूकमध्ये दिसत आहे.

हातात धारदार तलवार असलेल्या नव्या पोस्टरमुळे संजय दत्तच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. हे पोस्टर शेअर करताना, त्याने त्यांच्या चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमासाठी व शुभेच्छांसाठी धन्यवाद दिले आहेत. पोस्टर शेअर करताना संजय दत्तने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हे # केजीएफ चॅप्टर 2 वर आश्चर्यकारकपणे काम करत आहे. मला माहित आहे की तुम्ही सर्वजण बर्‍याच काळापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होतात आणि मी तुम्हाला खात्री देतो की, ही प्रतीक्षा व्यर्थ ठरणार नाही.”

अभिनेता संजय दत्तने सलग तीन वाढदिवशी या चित्रपटाचे विविध पोस्टर लॉन्च केले आहेत. तर तिसरे पोस्टर यावर्षी लॉन्च केलं आहे. त्याने पहिले ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर २०१९ मध्ये प्रसिद्ध केले आणि लिहिले की, “धन्यवाद यश, अधीरा म्हणून #केजीएफमध्ये सामील झाल्यामुळे खरोखर आनंदी आणि उत्साहित आहे. लवकरच भेटूया राक्षसाला’. त्यानंतर दुसरे पोस्टर २०२० आणि तिसरे यावर्षी लॉन्च केले आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत यश दिसणार आहे, ज्याने पहिल्या भागात सर्वांचे मन जिंकले. तर अभिनेत्री रवीना टंडनही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसेल. आतापर्यंत सर्व पात्रांचे लूक समोर आले आहेत. शिवाय संजय दत्त ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’, ‘शमशेरा’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटातही दिसणार आहे.