Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी अभिनेत्रींनी चाहत्यांना दिल्या मराठमोळ्या अंदाजात शुभेच्छा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र दिन’ अर्थातच कामगार दिन साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरित्या हा उत्सव साजरा करण्याची परवानगी नसल्याने सारेजण घरातूनच एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. अशावेळी अनेक मराठी कलाकार देखील आपापल्या घरातून आपल्या चाहत्याना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा त्यांच्या अनोख्या अंदाजात देत आहेत. अनेक कलाकारांनी मराठमोळा पेहराव करीत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. यात प्रामुख्याने मराठी अभिनेत्रीचा समावेश आहे.

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस आहे. आजचा महाराष्ट्र दिन हा ६१ वा असून शासनाने लागू केलेल्या नियमालीचे पालन करीत सर्वानी आपल्या घरातूनच हा उत्सव साजरा करीत आहे. दरम्यान मराठी कलाकार देखील नियमांचा आदर करीत घरात राहून सोशल मिडियाद्वारे शुभेच्छा देताना दिसत आहेत.

इतकेच नव्हे तर आपले मराठमोळ्या पेहरावातील विविध फोटोज शेअर करुन हा दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा एक लहानसा प्रयत्न करत आहेत. हे फोटो शेअर करताना कलाकारांनी आपल्या सर्व चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या आवडत्या अभिनेत्रींचे हे मराठमोळे अंदाज पाहून प्रेक्षकांच्या नजरा नक्कीच खिळून राहिल्या असतील यात काही वादच नाही. मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकरचा बाईकवर नववारीतील लूक सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे. तिचा हा अनोखा आणि हटके अंदाज पाहून प्रेक्षक घायाळ झाले आहेत.

तिच्या या फोटो आणि व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, सुखदा खांडकेकर यांनीहि आपले मराठमोळ्या अंदाजातील फोटोज शेअर करुन सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिला.