Take a fresh look at your lifestyle.

एकाच दिवशी प्रभास, महेश बाबू आणि पवन कल्याणचे आगामी चित्रपट देणार एकमेकांना टक्कर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून कोरोना विषाणूने थैमान घातले असल्यामुळे चित्रपटगृहे आणि चित्रीकरण बंद होते. मात्र आता हळूहळू कोरोनाचे निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. यामुळे देशभरातील चित्रपटगृहे आता लवकरच खुली होणार आहेत. तर यानिमित्ताने अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यामध्ये दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेते महेश बाबू, प्रभास आणि पवन कल्याण यांचे येते चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

चित्रपटगृहे सुरु होणार म्हटल्यानंतर आता अनेक निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात सुपरस्टार प्रभासने आपला ‘राधेश्याम’ हा चित्रपट पुढच्या वर्षी १४ जानेवारी २०२२ रोजी, मकर संक्राती अर्थात पोंगलच्या निमित्ताने प्रदर्शित होणार असल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. प्रभासच्या ‘राधेश्याम’ या चित्रपटात तो एका लव्हर बॉयच्या इमेजमध्ये दिसणार आहे. इतकेच नव्हे तर, हा चित्रपटच मुळात एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी असणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

पण आता प्रभाससाठी प्रेक्षकांची वाह वाह मिळवणे एवढे सोप्पे राहिलेले नाही. कारण नेमके प्रभाससमोर महेश बाबू आणि पवन कल्याण यांच्या जबरदस्त चित्रपटांचे आव्हान असणार आहे. महेश बाबू आणि पवन कल्याण तसेच राणा दब्बुगती यांनीही आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. यांचेही चित्रपट येत्या वर्षातील मकर संक्रातीच्या अर्थात पोंगलच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहेत. प्रभासचा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार असून महेश बाबू, पवन कल्याण तसेच राणा दब्बुगती यांचे चित्रपट स्थानिक स्तरावर प्रदर्शित होणार आहेत. मात्र स्पर्धा जोराची आहे यात काही वादच नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.