दिवाळीच्या मुहूर्तावर OTT करणार सिरीज – सिनेमांची आतिशबाजी; जाणून घ्या
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या दिवाळीचा एक मस्त बहारदार मौसम सुरु आहे. यामुळे सगळीकडेच दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतिशबाजी सुरु आहे. दार दुसरीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिरीज आणि सिनेमांची आतिशबाजी सुरु आहे. या दिवाळीच्या दिवसांमध्ये ओटीटी घेऊन येतोय मस्त, मनोरंजन करणाऱ्या सिरीज आणि सिनेमांची रास. जाणून घ्या कोणत्या तारखेला काय रिलीज होणार.
आज दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी तामिळ चित्रपट ‘जय भीम’ रिलीज झाला आहे. हिंदी आणि तेलगूमध्येही हा सिनेमा तुम्ही पाहू शकाल. अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटात वकीलाची प्रेरणादायी कथा पाहता येईल. तर हि भूमिका प्रसिद्ध तेलगू अभिनेता सुरीया साकारताना दिसत आहे.
यानंतर ३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राईमवर ‘अक्कड बक्कड रफू चक्कर’ ही सीरिजदेखील प्रेक्षकांच्या मनोरंजनास येईल. दिवंगत दिग्दर्शक व निर्माता राज कौशल यांची ही अखेरची सीरिज आहे. राज कौशल अर्थात मंदिरा बेदीचा पती यांचे याचवर्षी जूनमध्ये अकाली निधन झाले. या सिरीजमध्ये अनुज रामपाल, स्वाती सेमवाल, मोहन आगाशे , शिशीर वर्मा व मनीष चौधरी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
पुढे ५ नोव्हेंबर २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा व अभिमन्यू दासानी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर विवेक सोनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. याच दिवशी सोनी लिव्हवर ‘ट्रिस्ट विद डेस्टिनी’ हा चित्रपट देखील रिलीज होत आहे. याचे कथानक चार पात्रांभोवती फिरते. या चित्रपटात आशीष विद्यार्थी, जयदीप अहलावत, विनीत कुमार, अमित सियाल मुख्य भूमिकेत आहेत. तर हा चित्रपट प्रशांत नायर यांनी दिग्दर्शित केला आहे.
View this post on Instagram
यानंतर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर ‘रेड नोटिस’ हा अमेरिकन अॅक्शन कॉमेडी सिनेमा प्रदर्शित होत आहे. यामध्ये ड्वेन जॉनसन, रायन रेनोल्ड्स, गैल गैइड यात मुख्य भूमिकेत आहेत. तर याच दिवशी डिज्नी प्लस हॉटस्टारवर ‘ स्पेशल ऑप्स 1.5’ ही केके मेननची जबरदस्त वेबसीरिजदेखील रिलीज होत आहे. हि सिरीज नीरज पांडेने दिग्दर्शित केली आहे.
पुढे १८ नोव्हेंबर २०२१ रोजी एमएक्स प्लेअरवर ‘मस्त्यकांड’ ही सीरिज रिलीज होईल. यात रवी दुबे, रवी किशन, पीयूष मिश्रा, जोया अफरोज महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
यानंतर १९ नोव्हेंबर २०२१ रोजी ‘द व्हील ऑफ टाइम’ ही वेब सीरिज प्राईमवर रिलीज होईल. फँटसी, थ्रीलर आणि एपिक जॉनची ही सीरिज हिंदी, तामिळ व तेलगू भाषेतदेखील आपण पाहू शकता. शिवाय याच दिवशी नेटफ्लिक्सर कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ हा जबरदस्त सिनेमा रिलीज होणार आहे. यात कार्तिक टीव्ही अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे.
महिना अखेरीस २४ नोव्हेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर मार्वल स्टुडिओची ‘हॉक आई’ सीरिज रिलीज होईल. हि सिरीज हिंदी, तामिळ, तेलगू व मल्याळम भाषेत ही उपलब्ध असेल.