Take a fresh look at your lifestyle.

फक्त १ दिवस बाकी ‘जून’ येतोय ३० जूनला; ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर बहरणार अनोख्या प्रेमाचे रंग

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक लहानशी मनावरची जखम कुणी अलगद हळुवार प्रेमाने फुंकर घालून माया लावून बरी करण्याचा प्रयत्न केला तर? याला प्रेम म्हणता येईल ना? कारण ती एक फुंकर आपल्या मनावरच्या जखमेचा विसर पडणारी असते आणि हि अशी भावना सुप्त तितकीच गोड असते. हीच भावना घेऊन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित ‘जून’ हा चित्रपट ३० जून रोजी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’,’अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी’वर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अनेकांना तो कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता लागली होती. त्यानंतर आज केवळ एका दिवसाची प्रतीक्षा बाकी राहिली आहे.

 

या चित्रपटात अभिनेत्री नेहा पेंडसे – बायस आणि अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांची एक वेगळीच केमिस्ट्री यात पाहायला मिळणार आहे. ‘जून’ या चित्रपटात या दोघांची एक अनोखी प्रेमकहाणी एका वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. या चित्रपटात नेहा आणि सिद्धार्थसह, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन, निलेश दिवेकर आणि शुभमंगल ऑनलाईन मालिका फेम ऋषिकेश वांबूरकर यांच्यादेखील अन्य मात्र कथानकास साजेश्या असणाऱ्या महत्वाच्या भूमिका आहेत. जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांनी शब्दबद्ध केलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शाल्मलीने आपल्या स्वरांनी संगीतबद्ध केले आहे.

 

 

आपल्या भूमिकेबद्दल आणि एकमेकांसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना निर्माती, अभिनेत्री नेहा पेंडसे – बायस आणि सिद्धार्थ मेनन म्हणाले कि, ”भूमिकेबद्दल सांगण्यापेक्षा आम्ही एक सांगू, हा प्रत्येक व्यतिरेखेचा प्रवास आहे. प्रत्येक जण कशाच्या तरी शोधात आहे. प्रत्येकाचे आयुष्याशी निगडीत काही प्रश्न आहेत. आयुष्य बदलण्यासाठीची प्रत्येकाची धडपड आहे. त्यामुळे साचेबद्ध अशी कोणाची भूमिका नाही. एक नक्की यातील प्रत्येक व्यक्तिरेखा काहीतरी सकारात्मक विचार देऊन जाणारी आहे आणि एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव सांगायचा झाला तर आम्ही दोघंही एकमेकांना कधीच भेटलो नव्हतो. ‘जून’ मधील नेहा आणि नीलची जशी हळूहळू ओळख होत गेली. तशीच नेहा आणि सिद्धार्थचीही शूट दरम्यान ओळख होत गेली. त्यामुळे आमचा हा प्रवास खूपच छान झाला.”