Take a fresh look at your lifestyle.

उरले फक्त काहीच तास.. कोण ठरणार बिग बॉस मराठी 3’च्या महापर्वाचा महाविजेता?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व आता अगदीच शेवटच्या टप्प्यात आहे. आता उरलेत फक्त काहीच तास आणि यानंतर रंगणार ग्रँड फिनालेचा ग्रँड सोहळा. या सोहळ्यात कळणार या महा पर्वाचा कोण ठरणार महा विजेता. बिग बॉसच्या घरात टॉप ५ उरले आहेत. यामध्ये विशाल निकम, विकास पाटील, मीनल शहा, जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे हे पाच स्पर्धक आहेत. याच स्पर्धकांपैकी एक होणार या पर्वाच्या विजेत्या पदाचा मानकरी. त्यामुळे … प्रेक्षकांची हालत जणू दिल थांम के बैठिए अशी काहीशी झाली आहे.. काय बरोबर ना?

यंदा बिग बॉस ३ च्या या पर्वात यारी होती, दोस्ती होती, कधी भांडणं तर कधी मस्ती होती. ग्रुप ग्रुप करत खेळले पण सगळ्यांची एकच बस्ती होती आणि अखेर तो क्षण आला. तब्बल १०० दिवासांच्या प्रवासाची पूर्तता होऊन आता अगदी उद्याच विजेत्यांचा नाव घोषित होईल. बिग बॉस मराठीचं नवं घर नवीन सदस्यांनी सजलं आणि महाराष्ट्रात इंटरटेन्मेंटचा अनलॉक झाला. या प्रवासाची सुरूवात १५ सदस्यांसोबत झाली. वेगवेगळे रंग या घरात भरले. सोबत काही फटाके सोडले. यानंतर घरात सुतळी बॉम्ब होऊन वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्या आणि अखेर आता पर्वाचा शेवट आला.

बिग बॉसच्या कोऱ्या घराला या स्पर्धकांनी मायेची उब दिली. भावभावनांनी हे घर गलबलून गेलं. यानंतर आता हा प्रवास संपणार असला तरी इथे तयार झालेली नाती मात्र कायमस्वरूपी पक्की झाली. बिग बॉस मराठीचा हा सिझन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. प्रत्येक घरात हीच चर्चा कोण जिंकणार..? आता उरलेले ५ स्पर्धक प्रेक्षकांची पसंती आहेत. यातून ठरणार बिग बॉस मराठी सीझन ३चा महाविजेता. तुम्हीही उत्सुक असाल तर बिग बॉस मराठी ३ चा धमाकेदार ग्रॅण्ड फिनाले २६ डिसेंबर २०२१ रोजी संध्या ७.०० वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका.