Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता? ‘लॉ ऑफ लव्ह’ चित्रपटाच्या तिकिटावर बुलेट जिंकायची संधी; जाणून घ्या ऑफर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मित्रांनो जगात अशी कोणती व्यक्ती आहे जिला बुलेट या गाडीचे आकर्षण नाही. प्रत्येक तरुण आपल्याकडे बुलेट असावी असे स्वप्न पाहत असतो. आता समजा जर तुम्हाला कुणी सांगितलं कि जा रे हा चित्रपट बघ आणि त्याच्या तिकिटावर बुलेट घेऊन ये. तर तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीला वेड्यात काढाल. पण खरंच अशी संधी मिळाली तर? अहो तर काय मिळाली म्हणून समजाच. कारण आगामी मराठी चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ च्या निर्मात्यांनी प्रेमाच्या महिन्यात आपल्या खास प्रेक्षकांसाठी अशीच काहीशी ऑफर दिली आहे.

 

प्रेमाच्या महिन्यात प्रेमाचा अर्थ उलघडण्यासाठी येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात ‘लॉ ऑफ लव्ह’ हा मराठी प्रेममय चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेता जे. उदय यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बघायला या आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट घेऊन जा, अशी आगळी वेगळी भन्नाट संकल्पना आहे. ‘रॉयल एन्फिल्ड गाडीचं स्वप्न जो तो पाहतो, पण ती गाडी घेणे सर्वाना शक्य होत नाही. म्हणूनच या लकी ड्रॉ स्पर्धेमार्फत तब्बल ५० बुलेट महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना देण्याची योजना त्यांनी आखली आहे. यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन आणखीच खास होईल याची आम्हाला खात्री आहे’ असं अभिनेते आणि निर्माते जे. उदय यांनी सांगितलं.

 

 

वेदिका फिल्म क्रिएशननिर्मित ‘लॉ ऑफ लव्ह’ हा मराठी चित्रपट येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री शालवी शाह, अभिनेत्री प्राची पालवे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार, सचिन मस्के आणि स्वतः निर्माते जे उदय देखील मुख्य भूमिकेत दिसतील. प्रेमाची नवी परिभाषा चित्रपटामार्फत सांगण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, आम्हाला खात्री आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात आम्ही यशस्वी होऊ’, असं या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सांगण्यात आलं.