Take a fresh look at your lifestyle.

धमाकेदार मनोरंजनासाठी OTT सज्ज; नववर्षात येणार दर्जेदार 10 सीरिजचे सिक्वल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आता २०२१ संपत आले असून या वर्षभरात ओटिटीवर मनोरंजनाचा अगदी उत्सव साजरा करण्यात आला. या एकापेक्षा एक दर्जेदार वेब सीरीज प्रेक्षकांसाठी रिलीज झाल्या आणि उदंड प्रतिसाद मिळवून हिट झाल्या. यात फॅमिली मॅन २, असुर सीझन २ या वेब सीरीजचा चाहता वर्ग मोठा आहे. यानंतर आता वर्ष संपणार म्हणून काय झालं मनोरंजन सुरूच राहणार आहे. कारण २०२१मध्ये ओटीटीवर रिलीज झालेल्या काही वेब सीरीजचे सिक्वेल नवीन वर्षात अर्थात २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर जाणून घेऊ यात कोणकोणत्या वेब सीरीजचा समावेश आहे. खालीलप्रमाणे:-

 

१) आर्या २ – आर्य १च्या तुफान यशानंतर आर्य २ प्रेक्षकांच्या भेटीला आली. क्राइम थ्रीलर बेस्ड या सीरीजमधून अभिनेत्री सुष्मिता सेनने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एंट्री केली आहे. यानंतर आता २०२२मध्ये आर्याचा तीसरा सीजन येणार आहे.

 

 

२) मेड इन हेवन – या वेब सीरिजमध्ये जोया अख्तर आणि रिमा कागती यांनी कमाल केली आहे. २०१९ नंतर थेट आता २०२२ मध्ये ही वेब सीरीज पुढील भागासह रिलीज होणार आहे.

 

३) फॅमिली मॅन – ओटिटीवर अत्यंत गाजलेली वेब सीरीज म्हणजे फॅमिली मॅन २. ही वेब सिरीज तुफान गाजल्यानंतर फॅमिली मॅन ३ २०२२मध्ये येणार आहे.

 

 

४) पंचायत – अभिनेता जितेंद्र कुमार,नीना कुलकर्णी आणि रघुवीर अभिनीत पंचायत वेब सीरीजला मिळालेल्या भरपूर प्रेमानंतर आता मार्च २०२२मध्ये या सीरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

५) पाताल लोक – पाताल लोक ही २०२० साली रिलीज झाली होती. या सीरीजने धम्माल उडवली होती. या सीरीजचा सिक्वेल २०२२मध्ये येणार आहे.

 

६) असुर – अशरद वारसीची हिट वेबसिरिज असुर देखील २०२२मध्ये असुर २ च्या रुपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

 

७) दिल्ली क्राइम – वेब सीरीज दिल्ली क्राइम २०१९मध्ये रिलीज झाली होती. याही सिरीजचा पुढील भाग २०२२च्या मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

८) मिर्झापूर – मिर्झापूर सीझन २ ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आता २०२२मध्ये संपणार आहे. कारण मिर्झापूर ३ २०२२मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे.

 

९) कोड एम – कोड एम या सीरीजमध्ये अभिनेत्री जेनिफर विंगट मुख्य भूमिकेत आहे. यात ती एका सस्पेंन्स केसचा उलगडा करतेय. या केस चा उलगडा २०२२मध्ये या सीरीजच्या सिक्वेलमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

१०) मुंबई डायरिज – २६\११ च्या हल्ल्यावर आधारित मुंबई डायरिज या सीरीजचा सिक्वल २०२२मध्ये प्रेक्षकांना पाहता येईल.