आलिया आई रणबीर बाबा होणार; कपूर कुटुंबात चिमुकला पाहुणा येणार
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर नुसता आनंदी आनंद पसरला आहे. याचे कारण ठरले आहेत रणबीर आलीया. होय. सध्या बॉलीवूडकरांमध्ये आलिया – रणबीरच्या गुड न्युजची जोरदार चर्चा रंगली आहे. हि चर्चा सोशल मीडियावर फोटो स्वरूपात व्हायरल होतेय. काहीच वेळापूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट कपूरने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. तो पाहून हे सिद्ध होतंय कि कपूर कुटुंबात चिमुकला पाहुणा लवकरच दुडू दुडू पावलांनी येणार आहे.
आलियाने सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो हॉस्पिटलमधील आहे. आपलं बाळ कसा आकार घेत आहे हे सोनोग्राफीच्या माध्यमातून पाहता येत आणि याचवेळी हा फोटो क्लिक केला आहे. लवकरच आमचं बाळ येतंय असं लिहीत तिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोतमध्ये आलियाच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी ओसंडून वाहताना दिसत आहे. आलिया रणबीरची हि गुड न्युज समजताच त्यांच्या चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केलाय. आता कपूर कुटुंबियांच्या घरात पाळणा हलणार म्हणजे काय बॉलीवूडला नवा स्टार मिळणार असे म्हणायला हरकत नाही. आणखी एका सेलिब्सच्या घरात चिमुकला पाहुणा येतोय या आनंदाने सोशल मीडियावर नुसता कल्लोळ केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आलिया- रणबीर हे ब्रम्हास्त्र चित्रपटासाठी चर्चेत आहेत. शिवाय रणबीरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाचा ट्रेलरही व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. रणबीर आणि आलियाचं लग्न त्यांच्या चाहत्यांसाठी एक वेगळाच उत्सव ठरला होता.
यानंतर आता चिमुकला स्टार येणार हि बातमी समजताच आणखी एका उत्सवाची जय्यद तयारी चाहते करत असतील यात काही शंकाच नाही. तूर्तास सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिवाय बॉलिवूड मधूनही अनेक सेलिब्रिटी त्यांचे कोतुक करत आहेत.