Take a fresh look at your lifestyle.

आपली फॅमिली इंस्टाग्रामवर आहे; निक- प्रियांकाच्या बीच पिक्सवर परिणीतीची भन्नाट कमेंट

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन। बॉलिवूडची पिग्गी चॉप्स अर्थात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या बोल्ड आणि युनिक अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. इतकेच काय तर प्रियांका तिच्या पतीसोबत अर्थात निक जोनास सोबत अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये हटके लूकमध्ये दिसते . इतरांपेक्षा नेहमीच युनिक राहणं जणू या कपलचा छंद आहे. यावेळी तर प्रियांका तिच्या पतीसोबत मस्त बीचवर संडे एन्जॉय करताना दिसली. दरम्यान या स्पेशल संडेचे काही कमालीचे बोल्ड फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तोंडात बोटं घातली असणार यात काहीच वाद नाही. पण हे फोटो पाहिल्यानंतर तिची कझिन सिस्टर अर्थात परिणीती चोप्रा चांगलीच चक्रावली आहे. त्यामुळे फोटोवर तिने भारीच कमेंट केली आहे. सध्या प्रियांकाच्या फोटोपेक्षा परिचय कमेंटची चर्चा जोरात आहे.

बॉलिवूड आणि अगदी हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर पती निकसोबत बीचवर संडे एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका अगदीच बोल्ड लूकमध्ये दिसते आहे. तिने काळ्या आणि लाल रंगाची बिकिनी परिधान केली असून एका फोटोत फक्त ती तर दुसऱ्या फोटोत तिच्यासोबत निक दिसत आहे. मजेची बाब म्हणजे, ज्या फोटोमध्ये निक आणि प्रियांका एकत्र दिसत आहेत त्यात निक काटा चमचासोबत दिसतोय. इतकंच काय तर यावर प्रियंकाने कॅप्शनमध्ये लिहिले कि, स्नॅक आणि या सोबत तिने काटा चमचा चे इमोजी शेअर केले आहेत. त्यानंतर तिच्या या फोटोवर कमालीच्या कमेंट्स येत आहेत.

दरम्यान या फोटोवर कमेंट करताना प्रियांकाची बहीण परिणीती चोप्रा हिने लिहिले कि, जीज! मिमी दीदी! इथे काय चालले आहे.. आपली फॅमिली इंस्टाग्रामवर आहे.. 😱 * डोळे बंद करून लाईक बटण दाबण्याचा प्रयत्न करतेय. यानंतर अनेको चाहत्यांनी परिणितीच्या कमेंटला अनुसरून कमेंट्स केल्या आहेत.

कुणी म्हटलं आहे कि, डोळे बंद करा आणि लाईक करा. तर कुणी म्हटलं ओहो..फॅमिली पाहतेय. अशी प्रियांकाच्या हॉट फोटोंची चर्चा होता होता परिणितीच्या भन्नाट कमेंटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.