Take a fresh look at your lifestyle.

वहिनीसाहेबांचा गोंडस लेक स्ट्रॉबेरी खाण्यात दंग; व्हिडीओ झाला व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीची लोकप्रिय झालेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये वहिनीसाहेब हि भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री कडगावकर आता सध्यातरी आईसाहेबांची भूमिका अव्वल साकारतेय. गतवर्षी धनश्रीने एका गोड मुलाला जन्म दिला. सोशल मीडियाद्वारे तीने हि बातमी दिली होती. धनश्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. दरम्यान ती इंस्टावर तिच्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात धनश्री तिच्या मुलासोबत स्ट्रॉबेरीचा आनंद घेताना दिसतेय. धनश्रीचा लेक शेतातली स्ट्रॉबेरी तोडून खाण्याचा आनंद घेताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे धनश्रीची पोस्ट.

अभिनेत्री धनश्री कडगांवकरने सोशल मीडिया फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. सोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिले कि, ‘कबीरसाठी हा सगळा पहिलाच अनुभव होता. त्याला नक्कीच मजा आली असावी. सुरुवातीला मला वाटलं, न धुतलेल्या स्ट्रॉबेरी कशा त्याला खायला द्याव्या? पण त्याला काही सांगेपर्यंत त्याने ती खायला सुरुवात केली होती. एरवी सगळं स्टेरिलाइज वगैरे करणारी मी तिथे काहीच नाही करू शकले. पण या अनुभवाला तोड नव्हती, त्याने स्वतः ती स्ट्रॉबेरी तोडून स्वतः पहिल्यांदा खाल्ली. मजा आली मला त्याला असं बघून. आपली माती आपली माणसं,’ अशा शब्दांत धनश्रीने तिचा आईपणाचा आणखी एक अनुभव सांगितला.

धनश्री कडगांवकर हि एक मालिका जगतातील ओळखीचा आणि तितकाच लोकप्रिय चेहरा आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मराठी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तिने ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतून उत्तम भूमिका बजावल्या. मात्र ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्रीने यशाची मुसंडी मारली. कारण यातील वहिनीसाहेब या भूमिकेमुळे ती लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचली. तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली.