Take a fresh look at your lifestyle.

‘हमारी टीम आ रही है!’; नागराज मंजुळे आणि बिग बींचा ‘झुंड’ या तारखेला होणार रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे नेहमीच त्यांच्या सादरीकरणासाठी चर्चेत असतात. आतापर्यंत त्यांचा सर्वात गाजलेला चित्रपट आणि सर्वोत्तम कलाकृती म्हणजे ‘सैराट’. आजही या चित्रपटातील गाण्यांवर लोक थिरकताना दिसतात. यानंतर आता लवकरच नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट झुंड प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येणार आहे. येत्या मार्च महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

नागराज मंजुळेचे सिनेमे म्हणजे समाजमनाचं टिपलेलं सुरेख चित्रण अशी त्यांची ख्याती आहे. कारण मंजुळेंनी नेहमीच आपल्या चित्रपटातून खऱ्याची बाजू प्रकर्षाने प्रेक्षकांसमोर मांडली आहे. मंजुळेंच्या ‘पिस्तुल्या’ या शॉर्ट फिल्मपासून सैराट, फॅन्ड्री, नाळ अशा अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर आणि बुद्धीवर नक्कीच सकारात्मक प्रभाव केला आहे. यानंतर आता बऱ्याच दिवसांपासून रखडलेला ‘झुंड’ प्रदर्शित होत आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शनातील महानुभव असलेला नागराज मंजुळे यांचं बेस्ट कॉम्बिनेशन असणारा ‘झुंड’ येत्या ४ मार्च २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट येत्या ४ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. नागराज मंजुळे यांनी आणि बिग बींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर झुंड’चे पोस्टर शेअर करीत प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि, ”इस टोली से मुकाबला करने के लिए रहो तैयार. हमारी टीम आ रही है!” हे पोस्टर गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.