Take a fresh look at your lifestyle.

‘पद्म पुरस्कार येतोय’; स्वरा भास्करच्या सोयीस्कर निशाण्यावर कंगनाऐवजी विक्रम गोखले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रनौतने अलीकडेच देशाच्या स्वातंत्र्यावर वादग्रस्त विधान केले होते. यात तिने म्हटले होते कि १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक होती, तर २०१४ मध्ये खरं स्वातंत्र्य मिळालं. यानंतर देशभरातून तिच्यावर टीकांचा वर्षाव झाला असताना मराठी ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांनी तिच्या वक्तव्याचे जाहीर समर्थन केले आणि नवा वाद ओढवून घेतला. त्यामुळे आता टीकांमध्ये कंगनासोबत गोखलेंची अगदी बरोबरीची भागेदारी झाली आहे. यानंतर आता विक्रम गोखले यांनी कंगनाला पाठिंबा दिल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

कंगनाच्या वक्तव्यामुळे सुरु झालेल्या वादात स्वरा भास्करने उडी तर घेतली पण कंगनाऐवजी स्वराने तिला पाठिंबा देणाऱ्या विक्रम गोखलेंवर टीका करणे सोयीचे समजले. स्वराने अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट करत विक्रम गोखलेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. स्वराने एएनआयचे एक ट्विट शेअर केले आहे. या ट्विटमध्ये विक्रम गोखले प्रसार माध्यमांसमोर बसल्याचं दिसून येत आहे. सोबतच तिने “पद्म पुरस्कार येत आहे” असे कॅप्शन दिले आहे.

त्याच झालं असं कि, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिने एका मुलाखतीत म्हटले कि, भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४मध्ये मिळाले. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना यात विक्रम गोखले यांनी उडी घेतली. मराठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात सन्मान सोहळा आयोजित करणात आला होता. यावेळी त्यांनी देशाचं राजकरण आणि चलीत मुद्द्यांवर भाष्य केलं.

माध्यमांशी संवाद साधताना गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रनौतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही. पुढे ते म्हणतात कि,”भारत कधीही हिरवा होणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा देश भगवाच राहिला पाहिजे.” असं विधानही त्यांनी जाहीरपणे केले. परिणामी विक्रम गोखले यांनी कंगनाला पाठिंबा दिल्यानंतर हा वाद आणखीच चिघळल्याचं दिसून येत आहे.