शिवानी सुर्वेची बिग बॉसच्या घरात पुन्हा होणार ‘एन्ट्री’ !

मुंबई : अभिनेत्री शिवानी सुर्वे मराठी बिग बॉसच्या घरात पुन्हा परतणार असल्याची माहिती समोर आली आहे . बिग बॉसशी वाद घातल्यानंतर शिवानीला घराबाहेर काढण्यात आलं होतं.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता प्रकृतीत सुधार झाल्यानंतर शिवानीने बिग बॉसच्या घरात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवानी उद्या बिग बॉसच्या घरात परतणार आहे. मात्र याला चॅनलकडून अधिकृत दुजोरा अद्यापही … Continue reading शिवानी सुर्वेची बिग बॉसच्या घरात पुन्हा होणार ‘एन्ट्री’ !

डॉ. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : खासदार अमोल कोल्हे यांची झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे . आता त्यांची नवी मालिका ‘स्वराज्यजननी जिजामाता’ येत्या १९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबतची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. या मालिकेची निर्मिती जगदंब क्रिएशनच करणार असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली . … Continue reading डॉ. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार

मुंबई : पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत घातलेल्या वादावरून आता कंगना राणावत पुन्हा वादात अडकली आहे . एन्टरटेन्मेंट जर्नलिस्ट गिल्डने अभिनेत्री कंगना राणावतवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच तिने सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी गिल्डने केली आहे. ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने एका पत्रकाराशी अपमानास्पद वर्तणूक केली होती. भर पत्रकार परिषदेत कंगनाने या … Continue reading कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार

प्रिया बापट आणि उमेश कामत झळकणार ‘आणि काय हवं’ मधे !

नागपूर : तब्बल सात वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीतील ‘क्युट कपल’ अर्थात प्रिया बापट आणि उमेश कामत आता ‘आणि काय हवं’ या वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांना बघता येणार आहे. ‘मुरांबा’ फेम वरूण नावेकर दिग्दर्शित, अनिश जोग, रणजित गुगळे निर्मित ‘आणि काय हवं’ ही सहा भागांची वेबसिरीज १६ जुलैपासून एमएक्स प्लेयरवर प्रेक्षकांना कुठलंही शुल्क न देता मोफत बघता … Continue reading प्रिया बापट आणि उमेश कामत झळकणार ‘आणि काय हवं’ मधे !

आषाढी एकादशीनिमित्त अमिताभ बच्चन यांच्या खास मराठीतून शुभेच्छा

मुंबई प्रतिनिधी | आज आषाढी एकादशीच्या निमित्त गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतून पायी चालत निघालेले लाखो वैष्णवांचे भार पंढरीत दाखल झालेले आहेत. पंढरपूर शहरात सर्वत्र टाळ, मृदंगाच्या गजराने वातावरण वैष्णवमय झाले आहे. देशभरातून अनेक दिग्गज लोकांनी आणि कलाकारांनी आषाढीच्या खास शुभेच्छा सोशल मिडियावर दिल्या आहेत. अभिनयाचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनीदेखील खास मराठीत ट्विट करून सगळ्यांना … Continue reading आषाढी एकादशीनिमित्त अमिताभ बच्चन यांच्या खास मराठीतून शुभेच्छा

‘बधाई हो’ बधाई… बघा आणि रडा, अगदी मन मोकळं करून …

चित्रपट परिक्षण | चित्रपट पहायचा म्हणजे फक्त २-३ तास वेळ घालवायचा असं नव्हे, तर जगाचा अनुभव २-३ तासात मिळवण्याचा हमखास पर्याय होय. माझ्यासाठी सिनेमा कसा आहे हे ठरविण्याचे मोजमाप म्हणजे तो सिनेमा मला किती रडवतो हे होय… ” बधाई हो ” बघितला, लय रडलो. हम, हम, हं मी रडताना शेजारचा माझ्याकडे पाहतो आहे की नाही … Continue reading ‘बधाई हो’ बधाई… बघा आणि रडा, अगदी मन मोकळं करून …

#GullyBoy | वंचित समाजातील स्वप्नाळू तरुणांची वास्तव कथा

चित्रपटनगरी | विद्यानंद कडुकर प्रेम, मारधाड, चरित्रपट, राजकारण अशा विविध चित्रपटांची जंत्री मागील काही दिवसांत प्रेक्षकांना पहायला मिळाली. काही बडे कलाकार फ्लॉप ठरले तर अगदी नवोदितसुद्धा आता लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. मागील ४ वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयाने लोकांना खिळवून ठेवणाऱ्या रणवीर सिंगचा गल्लीबॉय हा चित्रपट वंचित समाजातील स्वप्नाळू तरुणांची कथा आपल्यासमोर मांडतो. झोपडपट्टीतील लोकांना, पैसा … Continue reading #GullyBoy | वंचित समाजातील स्वप्नाळू तरुणांची वास्तव कथा

तोडी मिल फॅंटसी – मध्यमवर्गीय तरूणांची स्टार्टअप इंडीयाची आणि जळजळीत वास्तवाची अनोखी सफर

नाटक परिक्षण | प्रा. हरि नरके काल बालगंधर्वला तोडी मिल फॅंटसी चा शुभारंभाचा प्रयोग बघितला. ह्या ब्रिलियंट कॉंमेडी आणि हटके म्युझिकल असलेल्या, तनमनाला प्रसन्न झिणझिण्या आणणार्‍या,गारूड करणार्‍या अनुभवातून मला अद्यापही बाहेर येता आलेलं नाहीय. आज मराठी रंगभुमीवर पाचकळ विनोदी आणि कृत्रिम मध्यवर्गीय जाणिवांच्या नाटकांची चलती आहे. मात्र खरा विनोद किती धमाल असतो, तो किती खळखळून … Continue reading तोडी मिल फॅंटसी – मध्यमवर्गीय तरूणांची स्टार्टअप इंडीयाची आणि जळजळीत वास्तवाची अनोखी सफर

देऊळ – मार्मिक सत्य मांडणारा चित्रपट  

चित्रपट परिक्षण अमित येवले काही सिनेमे हे वेगळी भूमिका मांडणारे असतात तर काही सिनेमे समाजाला आरसा दाखवणारे असतात. ‘देऊळ ‘ हा चित्रपट याच प्रकारात मोडणारा आहे. सध्यस्थितीतले एकदम मार्मिक सत्य यामध्ये दिग्दर्शकाने योग्यपणे मांडले आहे. चित्रपटाची संपूर्ण मांडणी ही एका गावातील वास्तव दृश्यांवर दाखवण्यात आली आहे. की जे गाव काही तरी सुधारणा करू पाहत आहे, … Continue reading देऊळ – मार्मिक सत्य मांडणारा चित्रपट  

लेथ जोशी : जुन्या गोष्टींतील नवीन बदल

चित्रपट परिक्षण | लेथ जोशी लेखक : अझीम अत्तार माझ्या वडिलांना कंपनीत काम करून नुकतेच १ जुलै ला ३१ वर्षे पूर्ण झाले. ३१ वर्षे एका कंपनीत एका मशीनवर वर्कर म्हणून काम करणे ही तशी सोपी बाब नाही. ८७ च्या काळात पोरसवदा वयात चालू केलेलं काम एखादा माणूस सलग ३१ वर्षे करतो आणि अजूनही तोच उत्साह … Continue reading लेथ जोशी : जुन्या गोष्टींतील नवीन बदल