पाकिस्तानी गायकाकडून करण जोहरला कायदेशीर कारवाईची धमकी; काय आहे प्रकरण?
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अलीकडेच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. पण त्यानंतर लगेचच या चित्रपटाला वादाच्या भोवऱ्याने विळखा घातलाय. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक भन्नाट गाणं ऐकायला मिळतं आहे. हे गाणं ‘नाच पंजाबन’ हे आहे. हे एक पार्टी सॉंग आहे. ज्यावर सिनेमातील सिनेमातील कलाकार लॉन्च सोहळ्याला थिरकताना दिसले आहेत. मात्र हे ढिंचॅक गाणं रिलीजनंतर वादाचं कारण ठरले आहे. कारण या गाण्यामागचं सत्य काही औरच आहे. हे गाणं काही नवीन नाही. तर खूप वर्षापूर्वीचं हे गाणं आहे ज्याला एका पाकिस्तानी गायकाने आवाज दिला आहे. त्याचे नाव गायक अबरार उल हक असे आहे. त्याने करण जोहरला गाण्याची कॉपी केल्याबद्दल कारवाईची धमकी दिली आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित ‘जुग जुग जियो’ चित्रपटातील हे ‘नाच पंजाबन’ गाणे पाकिस्तानी गाण्याची कॉपी आहे. हे हिंदी व्हर्जन कॉपी केलेले आहे असे गायक अबरार उल हकचे म्हणणे आहे. प्रसिद्ध गायक अबरारने सोशल मीडियावर करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनवर परवानगीशिवाय त्याचं गाणं चोरी केल्याचा आरोप केलायू. शिवाय थेट आरो करीत अबरारने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे कि, ”मी माझं गाणं ‘नाच पंजाबन’चे हक्क कोणत्याही भारतीय सिनेमाला विकलेले नाहीत. ते अद्यापही माझ्याकडेच आहेत, जर कोणी त्याचा गैरवापर केला तर मला कोर्टात दाद मागता येईल. म्हणूनच मी ही शक्कल लढवली होती. करण जोहरसारख्या निर्मात्याने गाणं कॉपी करायला नको हवं होतं. हे माझं सहावं गाणं आहे ज्याला कॉपी केलं जात आहे आणि याची मी कदापि कोणाला परवानगी दिलेली नाही”.
गायक अबरार उल हक याने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलं की, ”नाच पंजाबन या गाण्याचे हक्क कोणालाही विकलेले नाहीत. जर कोणी दावा करत असेल तर त्यानं तसा करारनामा दाखवावा,मी कायदेशीर कारवाई करणार आहे”. अबरारचं हे ‘नाच पंजाबन’ गाणं २००० साली आलं होतं. गाणं त्यावेळी जोरदार हिट झालं होतं. गायक अबरार हा गीतकार आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्येही सक्रिय आहे. शिवाय त्याला ‘किंग ऑफ पाकिस्तानी पॉप’ या पुरस्कारानेसुद्धा गौरविण्यात आलं आहे.