बॉक्स ऑफिस पॉलिटिक्स । दोन आठवड्यापूर्वी जशी बॉक्स ऑफिसवर तान्हाजी विरुद्ध छपाक ची मनोरंजक लढत झाली होती, तशीच या शुक्रवारी पंगा आणि स्ट्रीट डान्सर हे दोन चित्रपट रिलीज झाले . एक आहे टॅलेंटेड डान्सर्सची डान्स फिल्म आणि दुसरी आहे एका आईची प्रेरणादायी गोष्ट. पहिल्या दिवशीचा प्रतिसाद हा खूप महत्वाचा मानला जातो आणि तो त्या चित्रपटाच्या प्रमोशन वर अवलंबून असतो. स्ट्रीट डांन्सर ने पहिल्या दिवशी १०.३० कोटी तर पंगाने २.७० कोटी कमावले आहेत.
स्ट्रीट डान्सर हि ABCD ची फ्रँचाइजी असल्यामुळे आणि वरून धवन सोबत श्रद्धा कपूर आणि प्रभू देवा आल्यामुळे चित्रपटाला जास्त रिस्पॉन्स मिळाला असं आपण म्हणू शकतो. तेच दुसरीकडे पंगा मध्ये कंगना सोबत बाकी मोठे स्टार्स नाहीयेत.
दोन्ही चित्रपटांचे रिव्ह्यू बाहेर आले असून ते मात्र चित्रपटांच्या कमाईच्या विरोधी आहेत. पंगाला तुलनेत सगळ्याच समीक्षकांनी चांगले मूल्यांकन दिले आहे. त्यामुळे पुढच्या दिवसात दोन्ही चित्रपटाच्या कमाईतलं अंतर कमी झालं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको.
वाचा स्ट्रीट डान्सरचा रिव्ह्यू :
https://wordpress-520444-1655939.cloudwaysapps.com/film-review/street-dancer-3d-review-marathi/