Take a fresh look at your lifestyle.

बेबोच्या गाडीमूळे पँपराझी जखमी; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बेबो नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर खान हि नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. याहीवेळी ती चर्चेत आहे पण कारण वेगळे आहे. करीना कपूर खान अलीकडेच तिची मैत्रीण मलायका अरोराच्या घरी तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेली होती. दरम्यान परतत असताना नेहमीप्रमाणे पँपराझी जमा झाले होते. दरम्यान करीनाच्या कारखाली एका पॅपराझीचा पाय आला आणि त्याला धडक बसल्यामुळे तो जखमी झाला. हे दृश्य पाहताच करिनाने हातवारे करत ओरडून गाडी मागे घेण्यास सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

करीना कपूरची मैत्रीण मलायका अरोराची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खराब असल्यामूळे तिला पाहण्यासाठी करीना तिच्या घरी पोहोचली. अशा परिस्थितीत करीनाला पाहण्यासाठी काही पॅपराझी तिथे पोहोचले होते. दरम्यान, हा अपघात घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करीना कपूर खान हि मलायका अरोराच्या घरातून बाहेर येताच तिचा ड्रायव्हर कार घेवून गेटवर येतो. या दरम्यान ती येत असल्याचे पाहून पॅपराझींचा जमाव कारभोवती येतो. अशा स्थितीत एका पॅपराझीचा पाय गाडीखाली येतो.

या घटनेदरम्यान करीनाची नजर त्यावर पडते आणि ती जोरात ओरडते. तसेच हातवारे करत ड्रायव्हरला गाडी मागे घेण्यास सांगते. याशिवाय करीना पुढे येऊन त्या पँपराझीची विचारपूस करते. तिच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग ती घाबरल्याचे स्पष्ट करतात. नंतर ती गाडीत बसते आणि पुढे निघून जाते. हा व्हिडीओ विविध सेलिब्रिटी फोटोग्राफर्स आणि पँपराझींनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यांनतर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे.