Take a fresh look at your lifestyle.

‘पप्पी दे पारूला’ फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर अवतरणार साजणी रूपात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सप्तसूर म्युझिक प्रस्तुत “साजणी तू….” या नव्या कोऱ्या म्युझिक व्हिडिओचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये एक तरुणी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाठमोरी उभी दिसतेय. तेव्हापासून हि साजणी नक्की कोण आहे? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. मात्र आता याच उत्तर सापडलंय. या म्युझिक अल्बम मध्ये दिसणारी तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून पप्पी दे पारुला फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर आहे. या म्युझिक अल्बमची निर्मिती व्हीबी फिल्म्स आणि सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. तर हे गाणे अंबरीश देशपांडे यांनी लिहिले आहे. या गाण्याला ऋषिकेश रानडे या गायकाने आपला आवाज दिला आहे.

‘साजणी तू क्षण मोहरणारा, साजणी तू चांद राती तारा’ अशी मोहक रचना केलेल्या या गाण्यात अभिनेत्री स्मिता गोंदकर साजणी होऊन अवतरणार आहे. आदित्य बर्वे यांनी या म्युझिक व्हिडिओचे संगीत आणि दिग्दर्शन केले आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे. अशोक पवार या म्युझिस व्हिडिओचे छायालेखक आहेत. रोहन गोगटे, अजित नेगी यांनी संकलन केलं आहे. ‘साजणी तू’द्वारे एक फ्रेश म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री स्मिता गोंदकरने आतापर्यंत बरेच म्युझिक व्हिडिओ केले आहेत. मात्र बऱ्याच दिवसांनी ती पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. उत्तम लेखणी, श्रवणीय संगीत, सुंदर छायाचित्रण असे स्वरबद्ध गाणे लवकरच प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सप्तसूर म्युझिकच्या म्युझिक व्हिडिओंना आतापर्यंत मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहता ‘साजणी तू’ सुद्धा प्रेक्षकांची दाद मिळवणार यात काही वादच नाही.

 

याआधी स्मिता ‘बिग बॉस’ मराठी च्या पहिल्या सीजन मध्ये दिसली होती. सध्या स्मिता ‘काय घडलं त्या रात्री…’ या मालिकेतील ‘संजना’ हे पात्र साकारतेय. स्मिता गोंदकर हिच्या पप्पी दे पारूला या गाण्याला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतले होते. या गाण्यात ती अगदी बोल्ड अंदाजात दिसली होती. त्यानंतर आता साजणी तू मधून स्मिता प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडते हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.