Take a fresh look at your lifestyle.

‘सायना नेहवाल बायोपिक’ साकारतांना परिणीति चोप्राला झाली दुखापत

0

बॉलीवुड खबर । परिणीती चोप्रा बैडमिंटनपटु सायना नेहवाल वर आधारित बायोपिक मध्ये सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटासाठी परिणीति अविरत सराव करत आहे. याबायोपिकच्या नियमित प्रशिक्षणासाठी तिचे तात्पुरते निवासस्थान मुंबई येथील एक स्टेडियम आहे.

मात्र, या सरावा दरम्यान परिणीतीच्या मानेला दुखापत झाली आहे. बॅडमिंटन चॅम्पियन म्हणून तिच्या भूमिकेला योग्य न्याय मिळावा म्हणून अहोरात्र मेहनत घेत आहे. मात्र आता दुखपतीनंतर शूटिंग पुन्हा सुरू करण्यापूर्वी ती काही दिवस विश्रांती घेईल.

तिने तिच्या या दुखापती बाबत सोशल माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “ड्यूड, मी आणि सायनाची संपूर्ण टीम एवढी काळजी घेत आहे की मला दुखापत होऊ नये, परंतु गोंधळ उडाला. मला मानेला दुखापत झाली. पुन्हा बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वी मी जितके शक्य असेल तितके विश्रांती घेईन.”


Leave a Reply

%d bloggers like this: