Take a fresh look at your lifestyle.

अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार परिणीतीचा ‘सायना’ चित्रपट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्याचे भाष्य करणारा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून अतिशय चर्चेत होता. या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा हि अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट गेल्याच महिन्यात सिनेमाघरात प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटासंदर्भात एक मोठी बाब समोर येत आहे. हा चित्रपट आता लवकरच डिजिटल माध्यमात रिलीज होणार आहे. २३ एप्रिल २०२१ रोजी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा या चित्रपटाच्या ग्लोबल डिजिटल प्रीमियरमुळे खूप आनंदि आहे. याविषयी परिणीती म्हणाली की, ‘चित्रपटाच्या ग्लोबल डिजिटल प्रीमियरमुळे मी खूप उत्सुक आहे. आता जगभरातील लोक ही कथा बघू शकणार आहे. बायोपिक चित्रपटांमध्ये काम करणे एक मोठे आव्हान असते, हे मला समजले आहे आणि या चित्रपटात माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे सायनाचे पात्र साकारणे होते.

खरंतर सायनाने बॅडमिंटन पटू व्हावे हि तिच्या आईची इच्छा होती. यामुळे सायनासुद्धा आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमांना सामोरी जाते. पुढे जाऊन हे स्वप्न केवळ तिच्या आईचेच नव्हे तर तिचे स्वतःचेही होते. सायनाला आपल्या देशाकडून खेळायचे असते. यासाठी ती खूप कष्ट करत असते. पण स्वप्न पूर्ण करणे इतके सोप्पे नव्हते. दरम्यान तिच्या आयुष्यात बर्‍याच अडचणी येतात.

या अडचणींवर मात करीत सायना आपले स्वप्न कसे पूर्ण करते, यावर ह्या संपूर्ण चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. परिणीतीच्या अगोदर सायना चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारणार होती. पण शूटिंग सुरू होताच श्रद्धा कपूर आजारी पडली आणि नंतर तारखेमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला. यानंतर परिणीती चोप्राची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली. परिणीतीने आपल्या परीने सायनाच्या भूमिकेस योग्य असा न्याय मिळवून दिला आहे.