Take a fresh look at your lifestyle.

मराठमोळा ‘पावनखिंड’ ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार; कधी..? ते जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| पावनखिंड हा मराठमोळा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बाल, तरुण, मध्यम आणि अगदी वृद्ध अशा प्रत्येक वयातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं आहे. याचे कारण म्हणजे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास दर्शविण्यात आला आहे. या खिंडीचा इतिहास हा एक रणसंग्राम आहे. ही घटना घडून आज ३६१ वर्षांचा काळ लोटला मात्र बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा आजही लोकांच्या मनावर राज्य करतेय. त्यामुळे दिग्पाल लांजेकर लिखित- दिग्दर्शित ‘पावनखिंड’ चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळाला. यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 

 

शिवजयंतीच्या मुहूर्तावर पावनखिंड हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होता. यानंतर अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि थिएटर हाऊसफुल झाल्याचे दिसून आले. कोरोनामुळे हा चित्रपट निर्मात्यांनी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.

 

 

मात्र ‘पावनखिंड’ थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा, अशी दिग्दर्शक आणि कलाकारांची इच्छा होती. त्यामुळे आता थिएटर रिलीजनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

घोडखिंडीत बाजीप्रभूंनी गनिमांची वाट रोखून शर्थीने खिंड लढवली आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. ही खिंड बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं स्पर्शली आणि त्यामुळे ही भूमी पावन झाल्यामूळे या खिंडीला ‘पावनखिंड’ नाव पडलं. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात अस्खलितपणे मांडली आहे. हा चित्रपट शिवराज अष्टकातील तिसरा चित्रपट आहे. थिएटर रीलिजनंतर आता हा चित्रपट येत्या २० मार्च २०२२ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.