Take a fresh look at your lifestyle.

इतिहासाचं विजयी पराक्रमी पान …’पावनखिंड’; येत्या ३१ डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पावनखिंड हा इतिहासाचा असा अविभाज्य घटक आहे जो विसरता विसरणे शक्य नाही. प्रसंगी रक्त सांडले पण लढा थांबला नाही. पावनखिंड हा नावाप्रमाणेच अतिशय पावन असा रणसंग्राम आहे. आज या रणसंग्रामास जवळजवळ ३६१ वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र आजही हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर कोरलेली आहे. आजही निष्ठावंत बाजी प्रभूंची हि कथा जनमानसावर प्रभावशाली अधिराज्य गाजवित आहे. नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा हा अभूतपूर्व ऐतिहासिक अध्याय दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटातून आजच्या पिढीसमोर रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.

पावनखिंड या हचित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कधी उयेणार अशी सर्व मराठमोळ्या प्रेक्षकांची आतुरता ताणली होती. यानंतर अखेर आता येत्या ३१ डिसेंबर २०२१ रोजी ‘पावनखिंड’ हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची एक विजयगाथा आणि इतिहासाच्या सुवर्ण पानातील एक विजयी पराक्रमी पण म्हणून ओळख असणाऱ्या ‘पावनखिंड’ या संग्रामाची अंगावर काटा आणणारी कथा चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांना या वर्षाच्या शेवटच्या दिवशीपासून चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे. ए.ए.फिल्म्सची प्रस्तुती आणि आलमंड्स क्रिएशन्सची निर्मिती एक ऐतिहासिक पान नव्या पिढीसाठी उलघडणार आहे. निर्माते अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून ‘पावनखिंड’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

शिवरायांचा निष्ठावंत मावळा बाजीप्रभू यांनी घोडखिंडीत आपल्या सांडत्या रक्ताची आणि प्राणांची फिकीर न करता गनिमांची वाट रोखून धरली. या संग्रामात त्यांनी पराक्रमाची शर्थ करीत प्राणांची आहुती दिली पण खिंड लढवली. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्ताने खिंड न्ह्याली आणि पावन झाली. म्हणून या खिंडीला पुढे ‘पावनखिंड’ नाव पडलं. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार आहे. तर चित्रपटातील कळकजारांची नवे गुलदस्त्यात असली तरीही मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा भलामोठा फौजफाटा दिसून येईल यात काही शंका नाही. पण पोस्टरच्या माध्यमातून इतके स्पष्ट होत आहे कि शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर दिसणार आहे. मात्र बाजीप्रभूंची भूमिका कोण साकारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरलेले आहे.