Take a fresh look at your lifestyle.

‘पवित्र रिश्ता 2’ फेम शहीर शेखच्या वडिलांचे निधन; कोरोनाने हिरावला आधारवड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ शिवाय ‘पवित्र रिश्ता २’ फेम अभिनेता शहीर शेखच्या आयुष्यात दुःखाचे वादळ आले आहे. त्याच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीवर काळाने घाला घातला आहे. अभिनेता शहीर शेखच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. माहितीनुसार, मागील खूप दिवसांपासून शहीरच्या वडिलांची तब्येत अतिशय खराब झाली होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरु होते मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या वडीलांसाठी प्रार्थना करा अशी पोस्ट शेअर केली होती. यानंतर त्यांच्या निधनावर अभिनेता अली गोनीनेदेखील दुःख व्यक्त केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता शहीरच्या वडिलांची तब्बेत अचानक खालवली आणि त्यामुळॆ त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनामुळे त्यांच्या शरीरात संसर्गाचे प्रमाण वाढले होते. यामुळे त्यांची प्रकृती नाजूक होती. दरम्यान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते पण प्रकृती हाताबाहेर गेली होती. यावेळी शहिरने आपल्या मित्रांकडे आणि चाहत्यांकडे आपल्या वडीलांसाठी प्रार्थना करा अशी विनंती केली होती. यानंतर काही वेळानंतर त्याने सोशल मीडियावर वडिलांच्या निधनाची बातमी दिली. या बातमीनंतर अभिनेता अली गोनी याने दुःख व्यक्त केले आहे.

अभिनेता अली गोनी याने सोशल मीडिया ट्विटवर भावनिक ट्विट करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शहीरच्या वडिलांच्या निधनानंतर अली गोनीने ट्विट करत लिहिले आहे की, “इन्ना लिल्लाही वा इन्ना इलाही राजी उन. अल्लाह अंकल की आत्मा को शांति दे. तुम हौंसला रखो भाई’. शहीरने १८ जानेवारी २०२२ ला आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या वडिलांचा फोटो शेअर करून एक पोस्ट केली होती. यात लिहिले होते कि, “माझे वडील कोरोनामुळे आणि त्याच्या गंभीर संक्रमणामुळे अस्थिर आहेत. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा,” अशी पोस्ट शेअर केली होती. यातून शाहीरच वडिलांवरील प्रेम दिसून येते. अशातच त्याच्या वडिलांचे निधन होणे हि त्याच्यासाठी असहाय करणारी गोष्ट आहे.