Take a fresh look at your lifestyle.

अनुराग कश्यप विरोधात पायल घोषने ठोठावले राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणारी अभिनेत्री पायल घोष आता राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे ठोठावणार आहे. त्यासाठी ती मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना झाली. मुंबई पोलिसकडून न्याय मिळण्याची आशा नसल्याचे म्हणत, तिने थेट दिल्लीला गाठली आहे 

पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषण आणि बलात्काराची तक्रार केल्यानंतर या प्रकरणात अनुराग कश्यपची तब्बल 8 तास चौकशीदेखील झाली होती. तरीही मुंबई पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचे म्हणत तिने राष्ट्रीय महिला आयोगकडे या प्रकरणी तक्रार दाखल करायचे ठरवले आहे. पायल घोषची राष्ट्रीय महिला आयोगासोबत बैठक पार पडली असल्याचे, तिचे वकील नितीन सातपुते यांनी जाहीर केले आहे.

अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल.असा आरोप काही दिवसांपूर्वी पायल घोषने केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.