Take a fresh look at your lifestyle.

अनुरागनं माझ्यावर जबरदस्ती केली हे ‘या’ क्रिकेटपटूला माहीत होते ; पायल घोषचा धक्कादायक खुलासा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. अनुरागने 2014 मध्ये मला घरी बोलवून माझा विनयभंग केला आणि अश्लील वर्तन केलं, असं पायलने आपल्या आरोपामध्ये म्हटलं होतं. आता या प्रकरणी पायल घोषनं धक्कादायक खुलासा करताना एका क्रिकेटपटूचं नाव घेतलं आहे. अनुराग कश्यापनं माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं या क्रिकेटपटूला माहित होते, मात्र आता तो मौन धरत असल्याचे पायलनं म्हटले आहे.

पायल घोषनं या प्रकरणी भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणचे नाव घेतले आहे. पायलनं ट्वीट करत, “अनुराग कश्यपनं माझ्यावर जबरदस्ती केल्याचे मी कधी बोलले नाही. मात्र इरफान पठाणला सर्व माहिती होते. माझा चांगला मित्र समजून मी त्याला सर्व सांगितलं होतं, मात्र आता त्यानं या प्रकरणी मौन धरले आहे”. अस पायल म्हणाली.

त्यानंतर पायलनं इरफान पठाणसोबत फोटो शेअर केला. यात पायलनं म्हटले आहे की, “मी इरफानला टॅग केले याचा अर्थ मला तो आवडतो असे नाही. मी त्याला अनुराग कश्यपनं जबरदस्ती केल्याचे सांगितले होते. मी अपेक्षा करते की, मी इरफानला जे सांगितले आहे, त्याबद्दल त्यानं बोलावं”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.