Take a fresh look at your lifestyle.

….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली ‘ही’ अट

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री पायल घोषने काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. अनुराग वर आरोप करताना पायलने अभिनेत्री रिचा चड्ढाबाबत मीडियासमोर वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर रिचाने पायल विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता.

रिचाने पायल विरोधात मानहानीचा दावा ठोकल्या नंतर पायल तिचं वक्तव्य मागे घेण्यास तयार आहे आणि माफी मागायलाही तयार आहे पण पायलने माफी मागण्याबाबत एक अट ठेवली आहे. पायल म्हणाली की, ती रिचाची माफी मागेल, पण तिने गॅरन्टी द्यायला हवी की, यानंतर रिचा तिच्यावर कोणताही गुन्हेगारी आरोप लावणार नाही.

काय होते अनुरागवर आरोप-

अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल.

तसेच पायलने मीडियासमोर बोलताना सांगितले होते की, अनुराग कश्यप तिला कथितपणे म्हणाला होता की, रिचा चड्ढा, माही गिल आणि हुमा कुरेशी त्याला सेक्शुअल फेव्हर देतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’