Take a fresh look at your lifestyle.

मोदीजी आपको शर्म नहीं आती? प.बंगालमधील हिंसाचार पाहून मोदींवर बरसली अभिनेत्री; युजर्स म्हणाले..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर भडकलेल्या हिंसाचारावर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काल अभिनेत्री कंगना रणौतने रडारड करीत देशात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली होती. तिच्या मागोमाग आता अभिनेत्री पायल रोहतगीचा या संदर्भात व्यक्त होत रडतानाचा एक व्हिडीओ वायरल होतोय. या व्हिडीओत पायल संतापाच्या भरात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलीच बरसली आहे. मोदीजी आपको शर्म नहीं आती? असा थेट सवाल तिने मोदींना केला आहे.

या व्हिडीओत पायल रोहतगी ढसाढसा रडताना दिसतेय. मोदीजी, तुम्हाला पाठींबा देणा-यांसोबत हे असे होणार? मोदीजी हे ठीक नाही. आम्ही तुम्हाला सपोर्ट करायचा नाही का? तुम्हाला त्या लोकांनीही (पश्चिम बंगालच्या लोकांनी) सपोर्ट केला होता ना? आम्हा दोन तीन लोकांच्या मतांनी तर तुम्ही सत्तेत आला नाहीत ना? तुम्हाला असंख्य लोकांनी मते दिलीत. लोकशाही मार्गाने तुम्ही सत्तेत आलात. असे आताना आम्हालाच लक्ष्य का केले जातेय? आम्ही तुमचे समर्थक आहोत म्हणून? तुम्हाला जे करायचे ते करा, जसे करायचे तसे करा. पण लोकांची हत्या होता कामा नये, असे पायल रोहतगी या व्हिडिओत बोलताना दिसतेय.

पायलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. याबाबत काहींनी तिचे समर्थन केले आहे. तर काहीजण तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. पायल आता दुसरी कंगना बनण्याचा प्रयत्न करतेय असेही एकाने लिहिले आहे. तर पायलचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बिचारे मोदी रात्री जेवले नसतील, अशा शब्दांत एका उजरने तिची चेष्टा केली आहे.

तर कंगनाचे अकाउंट बंद झाले म्हणून पायल दीदी रडली असे म्हणत देखील तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. तर कुणी ऍक्टिंग छान आहे तुला नक्की पिक्चर्र मिळेल म्हणत तिची खिल्ली उडवताना दिसतंय.