Take a fresh look at your lifestyle.

संस्कृतीचा ठेका घेऊन वादंग माजवणारे लोक…; चिन्मयी सुमितच्या संतापजनक पोस्टमागील कारण काय?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मुलांना कुठेही , कधीही आणि कुणासमोरही हरून द्यायचं नाही हे एकमेव कारण उराशी बाळगून पालक आपल्या मुलांच्या संगोपनात चुटुकभरदेखील कसर सोडत नाहीत. अशात आजकालच्या पालकांना इंग्रजी मिडीयम आणि कॉन्व्हेंट शाळांचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. आजकाल कुणीच आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवू इच्छित नाही. काय तर म्हणे मराठी शाळेत जाऊन मुलं आयुष्याच्या स्पर्धेत मागे पडतात. परिणामी दरवर्षी शेकडो मराठी माध्यमांच्या शाळांना कुलुपं लागताना दिसत आहेत. यानंतर आता घरात मराठी बोललं जातं, पण मुलांना मराठी भाषेची ओळखचं नाही, हे चित्र साफ दिसू लागलंय. याच मुद्द्यावर भाष्य करताना चिन्मयीने फेसबुकवर एक संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.

स्टार प्रवाह या मराठी वाहिनीने आपल्या एका रिअ‍ॅलिटी शोचा एक प्रोमो नुकताच शेअर केला होता. या प्रोमोमध्ये स्पर्धक आणि मराठी मुलांना चक्क मराठी आकडे समजत नाहीत असं दिसून येत आहे. तसे पाहालं तर हा व्हिडीओ काहीसा मजेदार आहे. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर तितकाच विचार करायला भाग पाडणारा हा व्हिडीओ आहे. कारण हा विषय साधा असला तरी गंभीर नक्कीच आहे. याच पार्शवभूमीवर अभिनेत्री चिन्मयी सुमितने एक पोस्ट लिहिली आहे. तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘हे रील पाहून तुम्हाला कदाचित, कदाचित कशाला हमखास हसू येणार आहे…पण हळू हळू असंच होणार आहे. मराठी आकडे, मराठी स्वर, व्यंजनं, मुळाक्षरं सारीच विस्मरणात जाणार आहेत.

पुढे लिहिले आहे कि, वेष कसा असावा, खावं प्यावं काय, कुणाचे पुतळे, कुणाचे जयजयकार, खरा इतिहास, खोटा इतिहास, चुकीचा इतिहास ह्यावर संस्कृतीचा ठेका घेऊन वादंग माजवणारे लोक मराठीबद्दल काहीच भूमिका का घेत नाहीत? इतका उबग आलाय आता. आता सरकारने एक आदेश काढून एका फटक्यात बंदच करुन टाकाव्यात मराठी शाळा…’ चिन्मयीने केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि अनेक मराठी शाळेशी संबंधित लोकांनी अगदी हृदयाच्या कळकळीपासून कमेंट्स केल्या आहेत.

यावर एका नेटकऱ्याने लिहिले, मराठी बोलणं म्हणजे गावठीपणा असतो, “शी त्या भाषेत काय बोलायचं, नथिं ग डुईंग, मी माझ्या किड्डोज्शी इंग्लीश, हिंदीतच बोलते” असं एक शाळावर्गमैत्रिण बोलली होती. वाईट वाटलं होतं खूप पण आपली नापसंती, नाराजी बोलून दाखवूनही फायदा नसतो. आपल्या मातृभाषेतून संवाद साधणं, मातृभाषेतून मूलभूत गोष्टींचं शिक्षण घेणं खरंतर मला खूप गरजेचं वाटतं. यावर उलट सुलट अनेकांगी चर्चा वारंवारोत असतात. पण फारसं काही निष्पन्न होताना दिसत नाही ही खंत आहे. आपण असे म्हणू शकतो कि हि पोस्ट शासनाच्या कानापर्यंत एक गंभीर बाब पोहचवण्यासाठी सक्षम आहे.