Take a fresh look at your lifestyle.

करण जोहरचा हा अवतार ठरतोय चर्चेचा विषय; यूजर म्हणाला हा तर चलता फिरता अखबार

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर नेहमीच कोणकोणत्या कारणाने चर्चेत असतो. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर करण जोहर वर टीकेची झोड उठवली गेली होती. आता मात्र करण एका वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा ट्रोल होत आहे.

करण जोहरने एक असा आगळावेगळा शर्ट घातला आहे त्यामुळे सर्वत्र त्याची खिल्ली उडवली जात आहे. त्याने ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटसारखा शर्ट घातलेला फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. आणि त्याच्या या शर्टवर न्यूजपेपर प्रिंट होते. त्याचे या शर्टमधील फोटो व व्हिडीओ समोर आले आणि नेटक-यांची फटकेबाजी सुरू झाली.

एका यूजरने तर करणची चांगलीच मजा घेतली. कोई करण को समझाए की इसे पढना होता है, पहनना नहीं, असे या युजरने लिहिले. एका युजरने त्याला ‘चलता फिरता अखबार’ म्हणत त्याची खिल्ली उडवली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave A Reply

Your email address will not be published.