Take a fresh look at your lifestyle.

उफ्फ तेरी अदा! सोनालीच्या कातिल अंदाजाने चाहत्यांना केलं घायाळ; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि मराठी सिनेसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे जिने खऱ्याखुऱ्या अर्थाने अप्सरा म्हणजे काय हे दाखवून दिल आहे. तीच मोहक रूप, घायाळ करणारी नजर, कातिलाना अंदाज आणि खळखळून हसणं बस्स… मग काय? कोणीही समोर असलं तरी विकेट नक्की आहे. पण अश्या अप्सरेचं मन एका युवकावर आलं आणि त्यानंतर ती मिसेस झाली. यामुळे अनेक तरुणांच्या मनाचे लाख तुकडे झाले. पण काही हरकत नाही.

सोनालीने आपल्या चाहत्यांना काही लांब केलं नाही. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांवर जादू करताना दिसते. नुकतेच तिने तिचे साडीतील असे काही फोटो पोस्ट केले आहेत कि ते पाहून कुणीही प्रेमात पडेल. भले त्या प्रेमात पडण्याचा फायदा नसेल. तिच्या चाहत्यांनी तर या फोटोंवर अश्या काही कमेंट्स केल्या आहेत कि त्यातूनच सोनालीचा अंदाज खतरनाक असल्याचा अंदाज येतोय.

लग्नानंतर सोनाली प्रचंड चर्चेत असते. कारण एकतर तिचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यात ती आपले फोटो आणि व्हिडीओ नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. ज्यामुळे ती चाहत्यांच्या सपंर्कात असते. तर सोनालीचे हे साडीतील फोटो इतके बहारदार आहेत कि अनेक चाहत्यांनी थंडीत गरमीचं वातावरण झालाय अश्या स्वरूपाच्या कमेंट्स केल्या आहेत. सोनालीने शेअर केलेल्या फोटोंसोबत एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे. यात तिने लिहिले आहे कि, ‘झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले, साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे’. यावर सोनालीच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने मेहंदी रंगाची साडी परीधान केल्याचे दिसत आहे. शिवाय गळ्यात काळ्या मण्यांचे बेंबीपर्यंत येईल असे लक्षवेधी मंगळसूत्र तिने घातले आहे. तर कपाळावर टिकली लावल्यामुळे तिचे सौंदर्य आणखीच खुलून येत आहे. पारंपरिक वेषातील लक्षवेधी लूक असे म्हणायला काही हरकत नाही. सोनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच तिचे दोन दोन चित्रपट थिएटरमध्ये तब्बल ५० दिवस सलग हाऊसफुल गाजवताना दिसत आहेत. एक तर पांडू आणि दुसरा म्हणजे झिम्मा. जर तुम्ही आतापर्यंत तिचे हे सिनेमे पहिले नसाल तर तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकता. याशिवाय जर तुम्ही ओटीटी लव्हर असाल तर झी5 वर पांडू आणि अमॅझॉन प्राईम व्हिडिओवर झिम्मा तुम्हाला पाहता येईल.