Take a fresh look at your lifestyle.

‘पंतप्रधानांनी काहीही काम केलं नाही..’, ‘द काश्मीर फाईल्स’ युट्युबवर टाका; केजरीवालांची जोरदार बॅटिंग

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून या ना त्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान या चित्रपटावरुन सध्या देशाचं राजकारण चांगलच तापलंय. त्यात दिल्लीच्या विधानसभेत जेव्हा याच चित्रपटावर चर्चा झाली तेव्हा भाजपकडून ‘द काश्मिर फाईल्स’ करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानसभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले मत मांडले. तेव्हा ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यापेक्षा यूट्यूबवर टाका म्हणजे सगळ्यांना तो मोफत पाहता येईल”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला लोकांची विशेष पसंती मिळत असल्याचे पाहून रोज संसदेत किमान एकदा या चित्रपटाचे नाव काढले जाते. शिवाय चित्रपटाची कामे पाहता चर्चा तर होणारच.. काही भाजप शासित राज्यात हा चित्रपट करमुक्त केला आहे. यानंतर आता दिल्लीतही भाजपकडून चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली जातेय. यावरून आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पीएम मोदींना चांगलाच टोला लगावलाय.

दरम्यान केजरीवाल म्हणाले कि, ‘संपूर्ण भारतीय जनता पार्टी देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे. असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते काय? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? मुलं विचारतील बाबा काय काम करता? त्यांना सांगाल का चित्रपटाचे पोस्टर लावतो म्हणून. 8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही. 8 वर्षे खराब केले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावं लागत आहे की, वाचव वाचव म्हणून…’ अशा शब्दात केजरीवाल यांनी BJP पक्षाला आणि मोदींना निशाण्यावर धरलं.