Take a fresh look at your lifestyle.

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पीएम मोदी येणार; व्यथित होत ट्विटवर व्यक्त केल्या होत्या शोकसंवेदना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची न्यूमोनियाशी झुंज अपयशी झाली आणि आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान त्या ९३ वर्षाच्या होत्या. लता दीदींच्या निधनानारे संगीत कलासृष्टीत शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. लता दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे चाहते त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी मोठ्या संख्येने जमा झाले आहे. लता दीदींच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करताना अधिकृत ट्विटरवरून अनेक शोकसंवेदना व्यक्त करणारे ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. यात त्यांनी लिहिले कि, मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. लता दीदींकडून मला नेहमीच अपार स्नेह मिळाला हा मी माझा सन्मान समजतो. माझा त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहील. त्यांनी आपल्या देशात एक पोकळी सोडली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील.

यानंतर लता दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. गायिका लता मंगेशकर यांचे परतही दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी ब्रीच कॅंडी रुग्णालयातून निघणार आहे. यानंतर दीदींच्या प्रभुकुंज निवासस्थानी १२.३० ते ३.०० दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येईल. यानंतर पुढे मुंबईतील शिवाजी पार्क येथे लता दीदींचे पार्थिव ४.०० ते ६.०० च्या दरम्यान त्यांच्या चाहत्यांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. यानंतर ६ वाजून ३० मिनिटांनी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील आणि त्या अनंतात विलीन होतील.