Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचा सन्मान

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गानसम्राज्ञी लता मंगेशकर या देशाचा आवाज होत्या. गेल्या ६ फेब्रुवारी रोजी लता दीदींनी संपूर्ण जगाचा निरोप घेतला आणि संगीत जगतातील सुरांना पोरकेपण आलं. यानंतर समस्त सिनेइंडस्ट्रीत शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. तर चाहत्यांना आपला शोक आवरेनासा झाल्याचे पाहायला मिळाले. लता दीदींची सुरेल कारकीर्द हि आयुष्यभर जपण्याजोगी आहे. त्यामुळे लता दीदी भले आज शरीररूपी नसतील पण त्या लोकांच्या मनात कायम जिवंत आहेत. दरम्यान लता दीदींच्या नावाने पहिला वाहिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याना प्रदान करण्यात आला आहे. रविवारी २४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत पार पडला. दरम्यान अनेक दिग्गज मंडळी आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते.

दरम्यान, लता दीनानाथ मंगेशकर असे नाव असलेला हा अतिशय मानाचा पुरस्कार देशाच्या पंतप्रधानांना प्रदान करताना मंगेशकर कुटुंबीयांनी दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. तर मोदींनाही आपल्या भावना आवरला नाहीत आणि दीदींच्या आठवणीत व्यक्त होत ते भावुक झाल्याचे दिसून आले. दरम्यान हा पुरस्कार दीदींच्या नावाने मिळणार पहिला पुरस्कार आहे आणि तो मी जनतेला अर्पण करतो असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे लता दीदी जनतेच्या होत्या. त्याचप्रमाणे हा पुरस्कारही जनतेचा आहे असे भावोद्गार त्यांच्या मुखातून निघाले.

काल अर्थात रविवारी २४ एप्रिल २०२२ रोजी हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई, मंगेशकर कुटुंबीय आणि कलाक्षेत्रातील अनेक मोठी दिग्गज मंडळी उपस्थित राहिली होती. मात्र या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित नव्हते. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्यामुळे या सोहळ्यास त्यांची उपस्थिती नव्हती असे म्हटले जात आहे. परंतु याच वेळेत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ महिला शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांची भेट घेण्यासाठी भोईवाडा परळ येथील दाभोळकर वाडी येथे हजेरी लावली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील हे दर्शनी संबंध सध्या चांगलेच चर्चेत आहेत.