Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कारणामुळे पोलिसांची अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर धाड

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरणात केंद्रीय गुन्हे शाखेने अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. या प्रकरणातील आरोपी आदित्य अल्वा सध्या फरार असून आदित्य हा विवेक ओबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आहे. त्यामुळे आदित्य विवेकच्या घरात लपला असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे शाखेला अर्थात सीसीबीला मिळाली आहे. त्यानंतर सीसीबीने विवेक ओबेरॉयच्या घरावर छापा टाकला.

विवेक ओबेरॉयच्या बायकोचा भाऊ आदित्य अल्वा  हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे. आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. हाय प्रोफाइल पार्टीमधील तो एक लोकप्रिय चेहरा आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून आदित्य गायब आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. तो विवेकच्या घरात असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांना मिळाली. त्यामुळे बंगळुरू पोलीस मुंबईत आले.

आदित्य अल्वा गायब आहे. तो विवेक ओबेरॉयचा नातेवाईक आणि त्याच्या घरी आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, असं बंगळुरू पोलिसांनी सांगितलं. बंगळुरू पोलीस सर्च वॉरंट घेऊन विवेक ओबेरॉयच्या जुहूतील घरात पोहोचले. दोन पोलीस दुपारी एक वाजता विवेकच्या घरी दाखल झाले. तेव्हापासून त्याच्या घरात तपास केला जातो आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य अल्वा याचा ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीशी जवळचा परिचय आहे. कोट्टनपेट पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या ‘सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरणात आदित्य अल्वा यांचे नावही समोर आले आहे. तसेच आदित्य हा आणखी बऱ्याच पार्ट्यांमध्ये सहभागी झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.