Take a fresh look at your lifestyle.

पूजा बेदी म्हणतेय, उद्या मृत्यू आला तर…? शेअर केला गोवा व्हॅकेशनचा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाचा वाढत कहर एकीकडे बॉलीवूडला घट्ट विळखा घालून बसलाय. तर दुसरीकडे काही सेलिब्रिटी मजेत सुट्टी घालवताना दिसत आहेत. सध्या बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी तिच्या होणा-या पतीसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेतेय. पूजाने तिच्या सोशल मीडियावर गोवा व्हॅकेशनचा एक व्हिडीओ शेअर केला असून तो तुफान व्हायरल होतोय. याच्या कॅप्शनमध्ये तिने उद्या मृत्यू आला तर ? असे म्हटले आहे.

‘स्वस्थ, आनंदी राहण्यासाठी एन्जॉय गोवा. मेंदूला मुक्त करा. काहीही भीती नाही. आयुष्य हे जगण्यासाठी आहे, स्वत:ला कैद करून घेण्यासाठी नाही. एका व्हायरसच्या दहशतीसह एक वर्ष आणि मग अनेक वर्षे मास्क. हा व्हायरस इतक्यात आपला पिच्छा सोडणारा नाही. वर्षभर मास्क लाऊन आणि लॉकडाऊनमध्ये राहूनही उद्या मृत्यू आला तर…? तर तुम्हाला सर्वात मोठी खंत काय वाटेल? ‘, असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शन म्हणून लिहिले आहे.

आमिर खानच्या ‘जो जिता वही सिंकदर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पूजा बेदीने डेब्यू केला. या चित्रपटानंतर ती लुटेरे, फिर तेरी कहानी याद आयी, शक्ती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली. वय वर्षे ५० असणारी पूजा नेहमीच तिच्या फोटोंमुळे आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर पूजा आदित्य पांचोलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यावेळी आदित्यचे लग्न देखील झाले होते. पण तरीही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंतर आदित्यचे तिच्याच घरात काम करणा-या बाईसोबत संबंध आहेत हे पूजाला कळले आणि त्यामुळे तिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

पुढे १९९४ मध्ये तिचे फरहान फर्निचरवालासोबत लग्न झाले. पण लग्नानंतर १२ वर्षांनी त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्या दोघांना दोन मुले देखील आहेत. त्यानंतर पूजा आणि द्वीती विक्रमादित्य अनेक महिने नात्यात होते. त्याच्यासोबत लग्न करण्याची देखील पूजाची इच्छा होती. पण या नात्याला द्वीतीच्या कुटुंबियांनी मान्यता न दिल्याने त्यांनी ब्रेकअपचा निर्णय केला. बिग बॉसच्या घरात असताना पूजा अभिनेता आकाशदीप सेहगलच्या प्रेमात पडली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर देखील त्या दोघांना अनेक ठिकाणी एकमेकांसोबत पाहाण्यात आले होते. आकाशने पूजाच्या नावाचा टॅटूदेखील हातावर काढला होता. ते दोघे लग्न करतील असे वाटत असतानाच त्यांचे ब्रेकअप झाले. पूजाने फेब्रुवारी २०१९ मध्ये मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत साखरपुडा केला. तो तिचा शाळेतील मित्र असून ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.