Take a fresh look at your lifestyle.

पुजा हेगडेचा हा फोटो होतोय व्हायरल!

0

मुंबई | अभिनेत्री पूजा हेगडे दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पूजाने दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या ‘मोहंजदडो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती हृतिक रोशनसह मुख्य भूमिकेत झळकली होती. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी जादू केली नाही. परंतु पूजाचा दाक्षिणात्य चित्रपट ‘महर्षीने’ने अनेकांच्या मनावर राज्य केले. या चित्रपटातून पूजा खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली.

नुकताच पूजाच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये पूजा अत्यंत क्यूट अंदाजात दिसत आहे. पूजा या फोटोमध्ये शाळेच्या गणवेशात दिसत असून बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. पूजा लवकरच अभिनेता अल्लू अर्जुनसह ‘AA19’ या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे. बॉलिवूडमधील साजिद नाडियाडवाला निर्मित आणि फरहाद सामजी दिग्दर्शित ‘हाऊसफूल ४’ या चित्रपटात ती काम करणार आहे. तसेच आणखी एका तेलुगू चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससह दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी जा हेगडेने हैदराबादमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्याच्या चर्चा होत्या. मात्र या सर्व चर्चा खोट्या असून त्यात अजिबात तथ्य नसल्याचे पूजाच्या मॅनेजरने स्पष्ट केले आहे. नुकताच पूजाचा ‘महर्षी’ हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी हैदराबादमध्ये आयोजिक एका कार्यक्रमातून हॉटेलकडे जाताना पूजाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवली आणि पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले, अशा अफवा पसरल्या होत्या.

Leave a Reply

%d bloggers like this: