Take a fresh look at your lifestyle.

‘ब्युटी अँड द बीस्ट’; अभिनेत्री पूजा हेगडेच्या कमाल साडीतील फोटोंनी केले चाहत्यांना बेहाल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या लक्षवेधी अभिनयासह फँटास्टिक स्टाईलीश लूकसाठी ओळखली जाते. आजच्या तरुणाईसाठी ती फॅशन आयकॉनिस्ट आहे. शिवाय ती सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते. यामुळे पूजा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. तिचे ट्रेंडी आऊटफिट, साडीतील फोटो आणि अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट ती सोशल मीडियावर करत असते. नुकतेच पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर साडीतील घायाळ करणारे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांची नजर हटत असेल असे काही वाटत नाही.

आपल्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या पूजा हेगडेने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पूजाने पेस्टल हिरवी बॉर्डर असलेली टिशू सिल्क साडी परिधान केली आहे. यावर पांढरे धागे आणि सिल्व्हर मिररचे अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे. त्यावर पूजाने पांढऱ्या रंगाचा बॅलेट स्टाइल ब्लाउज परिधान केला आहे. तर हातात पेस्टल रंगाचे ब्रेसलेट घातले. हे फोटो शेअर करताना तिने ब्युटी अँड द बीस्ट असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या कॅप्शनमध्ये ‘बीस्ट’ हा शब्द तिच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या संदर्भाने लिहिला आहे.

अभिनेत्री पूजा हेगडेचे हे फोटो पाहून चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान एका चाहत्याने क्युटि असे म्हटले आहे. तर अन्य एकाने लिहिले कि, सत्यता हि आहे कि तुझे हास्य अतिशय सुंदर आहे. याशिवाय आणखी एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले आहे कि, हि सुंदरा अतिशय सुंदर आहे. अशा प्रकारे पूजाच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केल्याचे दिसत आहे. अभिनेत्री पूजा हेगडे हि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असून तिने बॉलिवूडसह तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केले आहे. अलीकडेच ती अभिनेता थलपती विजयसोबत ‘बीस्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे समजत आहे.