Take a fresh look at your lifestyle.

हेरथ मुबारक! खेमूंच्या घरी महाशिवरात्रीची पूजा संपन्न; ज्युनिअर इनायाचे फोटो- व्हिडिओ व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांच्या घरी नुकतीच महाशिवरात्रीची पूजा संपन्न झाली. या पूजेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ खुद्द सोहा आणि कुणालने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान सोहा आणि कुणालची मुलगी इनायाने सोशल मीडिया युजरचे लक्ष वेधून घेतले आहे. या पुजेदरम्यान कुणालचे कुटुंबीयदेखील सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये चिमुकली इनाया दिसतेय आणि तिने नेटकऱ्यांना चांगलाच मोहून टाकलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

इनायाच्या व्हायरल फोटोत दिसतंय की, राजमा, भात, पालक पनीर, डाळ असे अनेक पदार्थ कुणालसमोर ठेवलेले आहेत. इनाया वडिलांना राजमा वाढत असताना सोहाने तिचा फोटो क्लिक केला आणि हा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत हेरथ च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवरात्रीच्या एक दिवस आधी सुरु होणारा हेरथ पर्व हा काश्मिरी हिंदू समाजातील महत्त्वपूर्ण सण आहे. इनायाचे आणखी बरेच फोटो सोहाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर आता इतके व्हायरल होत आहेत की बस…

व्हायरल फोटोंमध्ये इनायाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. दरम्यान कुणालचा शंख वाजवतानाचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत लिहिलं आहे की, ‘हेरथ मुबारक. सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. सर्वांना आनंद, शांती, प्रेम लाभो. ओम नम: शिवाय’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

गेल्या महिन्यात सोहा आणि कुणालने लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला आहे. जुलै २०१४ मध्ये पॅरिसमध्ये या दोघांनी साखरपुडा केला आणि त्यानंतर २५ जानेवारी २०१५ रोजी या दोघांनी मुंबईत लग्नगाठ बांधली. पुढे २९ सप्टेंबर २०१७ सालामध्ये सोहाने इनायाला जन्म दिला.