Take a fresh look at your lifestyle.

पूनम पांडेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल ; पण डोकेदुखी वाढली गोवा सरकारची

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | नेहमीच आपल्या हॉट अंदाजामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. नुकतीच पूनम पांडे गोव्यात शूटिंगनंतर मुंबईत परतली. त्यानंतर गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला संघटनेने पूनम पांडेवर गोव्याच्या चापोली धरणावर अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप लावून एफआयआर दाखल केला.

पुनमच्या या अश्लील व्हिडिओ मुळे गोवा सरकार मात्र अडचणीत आले आहे. गोव्यातील चपोली धरणावर पूनमने एक व्हिडिओ शूट केला होता जो मोठ्या प्रमाणात वायरल झाला. हा व्हिडीओ पूर्णपणे पॉर्न मध्ये मोडत असून विरोधकानी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच कोरोना काळात लोकांना धरणावर जाण्यासाठी बंदी घातली असताना पूनमला परवानगी कशी दिली असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात आला आहे.

पूनम पांडे आपल्या ऍप साठी अर्धनग्न व्हिडिओ शुट करत असते, मात्र गोव्यात बंदी असलेल्या ठिकाणी तिला परवानगी कोणी दिली असा थेट सवाल गोवा फॉरवर्ड सरकारने केला आहे.तसेच गोवा हे पोर्न डेस्टिनेशन म्हणून प्रोमोट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का असा सवाल करत भाजप सरकारला धारेवर धरले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.