Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक!!!!सुशांत पाठोपाठ अजून एका अभिनेत्याची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येतून लोक अजून सावरले नाहीत त्यातच आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. सुशांत सिंगप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता आशुतोष भाकरे यांनीही आत्महत्या केली आहे. 32 वर्षीय आशुतोषने 29 जुलै रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोषच्या आत्महत्येमागील ‘डिप्रेशन’ हे कारण असल्याचे म्हटले जात आहे.

आशुतोष भाकरे हे मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख यांचे पती होते. आशुतोषच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटूंबावर दु: खाचा डोंगर पडला आहे. परंतु त्यांनी हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी आशुतोषचे आई-वडील गणेश नगर परिसरातील फ्लॅटवर आले असता त्यांना आशुतोषचा मृतदेह लटकलेला आढळला.हे पाहून त्यांना धक्काच बसला. पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून आशुतोष  नैराश्यात होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

आशुतोष भाकरे यांनी ‘भाकर’ आणि ‘विचार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केले आहे. त्याने 2016 मध्ये अभिनेत्री मयूरी देशमुखशी लग्न केले. दोघेही त्यांच्या विवाहित जीवनात खूप आनंदी होते. त्याचवेळी ते लॉकडाऊन दरम्यान पत्नीसह नांदेड येथील त्यांच्या घरी थांबले होते.

Comments are closed.