Take a fresh look at your lifestyle.

‘दुर्दम्य लोकमान्य’नंतर विवेक समूहाकडून ‘कालजयी सावरकर’ची निर्मिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विवेक समुह निर्मित ‘दुर्दम्य लोकमान्य’ ह्या लोकमान्य टिळकांच्या आयुष्याचे नवे पैलू नवे पदर नव्याने उलगडून सांगणाऱ्या माहितीपटाची मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष स्क्रिनिंगसाठी निवड करण्यात आली आहे. माहितीनुसार, येत्या ३१ मे २०२२ रोजी दुपारी ०२:०० वाजता या माहितीपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. मुख्य म्हणजे मुंबईतील पेडर रोडवरील फिल्म डिव्हिजन येथे हे स्क्रिनिंग होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ‘विवेक समूह’ आणखी एका लघुपटाची निर्मिती करीत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्याचे नाव कालजयी सावरकर असे आहे.

Kaljayi Savarkar

हा एक लघुपट असून याची सर्व स्तरावर चालीचं चर्चा ऐकिवात आहे. यासंबंधीची अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र तरीही हा लघुपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर बेतलेला असेल असे खात्रीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. ‘कालजयी सावरकर’ असे या नव्या लघुपटाचे नाव असून नुकतेच त्याचे पहिले पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचे विविध पैलू आणि अंतरंग उलगडून दाखवले जातील. मुख्य बाब सांगायची म्हणजे गेली अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रातील एक प्रथितयश नाव म्हणून ख्याती असलेले गोपी कुकडे यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.

तसेच या लघुपटाचे लेखन अभिनेत्री- लेखिका समीरा गुजर आणि अमोघ पोंक्षे यांनी केले आहे. तर अक्षय जोग यांनी संशोधनासाठी लागणारे सहाय्य केले आहे. या लघुपटात नक्की कुठले कलाकार असणार आहेत आणि ते कुठली भूमिका साकारणार आहेत याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर या लघुपटात सावरकरांची मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी विलक्षण उत्सुकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचे चित्रण करण्यापलीकडे हा लघुपट त्यांच्या कालातीत विचारांना केंद्रस्थानी ठेऊन त्यावर भाष्य करताना दिसेल असे लघुपटाच्या नावावरून लक्षात येत आहे.