Take a fresh look at your lifestyle.

स्मशानभूमीत ‘फनरल’चा मुहूर्त संपन्न; हेड कॉन्स्टेबल वारेंच्या हस्ते पोस्टर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुम्ही आतापर्यंत सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांच्या पोस्टरचे रिलीज असेल किंवा म्युझिक लॉन्च असे सोहळे मोहमोठ्या बँक्वेट मध्ये होताना पाहिले असतील. अगदी बँक्वेट नसेल ना तर मोठे हॉटेल किंवा मंच तर १०० % असतंच. पण कधी कोणत्या चित्रपटाचा मुहूर्त स्मशानभूमीत केल्याचे ऐकले आहे का..? नाही ना. पण यावेळी असं झालं आहे. एका अनोख्या संदेशासह ‘फनरल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे शीर्षक जितके खास आणि वेगळे तितकेच याच्या कथानकातही वेगळेपण आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा मुहूर्तसुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीने झाला आहे. स्मशानभूमीत मुहूर्त होणारा हा पहिलाच चित्रपट असेल. त्यामुळे सर्वत्र याची चर्चा आहे.

या चित्रपटाचे निर्माते आणि लेखक रमेश दिघे तसेच दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीशी कोणताही संबंध नसताना अतिशय मार्मिक विषयाला हात घालत ‘फनरल’ची निर्मिती केली आहे. ‘जगू आनंदे आणि निघू आनंदे! हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘फनरल’ हा मराठी चित्रपट येत्या १० जून २०२२ रोजी सर्वत्र राज्यात प्रदर्शित होतोय. ‘माणूस जन्माला रडत येतो आणि सारं जग आनंदी होतं. पण जेव्हा तो जातो, तेव्हा तो शांत होतो आणि सारं जग रडतं. याचा गाभा इतका जीवनशैलीशी निगडित आहे कि पाहणारा हरवून जाईल. दरम्यान सर्वोत्कृष्ट चित्रपटापासुन ते सर्वोत्कृष्ट संगीतापर्यंत प्रत्येक सन्मानावर, विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. या चित्रपटात आरोह वेलणकर, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील.

मुख्य म्हणजे, ‘मृत्यु हा अशुभ नसून अमूल्य आहे’, त्यामुळे प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीला त्याचा शेवटचा सन्मान ही यथायोग्य पद्धतीनेच मिळायला हवा. अशा उत्तम आणि वाखाडण्याजोगा विचार कायम बाळगून कार्यरत असणारे ताडदेव पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव वारे यांच्या हस्ते ‘फनरल’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव वारे यांनी आजतागायत ४० हजारांहून अधिक बेवारस मृतांचे अंतिम संस्कार सर्व विधींनी केले आहेत. त्यामुळे हा चित्रपट देखील समाजाप्रती प्रबोधनपर विचार घेऊन प्रदर्शित होत असल्यामुळे याला प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देतील अशी आशा आहे.