Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मेरी ख्रिसमस’ लवकरचं..; कॅटरिना आणि विजय सेतुपतीची केमिस्ट्री पहायला चाहते उत्सुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 26, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Merry Christmas
0
SHARES
144
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे नवनवीन लूक आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती ती सोशल मीडियावर देत असते. अलीकडेच तिने आपला आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’विषयी एक पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरसह तिने आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. हि गुड न्यूज अशी कि या चित्रपटातून कॅटरिना कैफ हि साऊथ स्टार विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून याबाबत प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

अभिनेत्री कॅटरिना कैफने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये दोन हातात दोन फुटलेले वाईन ग्लास दिसत आहेत आणि खाली काही काचा पडल्याचेही दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत कॅटरिनाने लिहले आहे कि, ‘आम्हाला आमचा हा चित्रपट याच ख्रिसमसला प्रदर्शित करायचा होता. पण यात काही बदल झाले आहेत. लवकरच थिएटरमध्ये भेटू’. या चित्रपटाच्या माध्यामातून कॅटरिना साऊथ सिने सृष्टीत पदार्पण करते आहे. विजय सेतुपतीसोबत तिचा हा पहिलाच चित्रपट असून यांची नवी जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘बदलापूर’ चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन करत आहेत. गतवर्षी २०२१ मध्ये या चित्रपटाची घोषणा झाली होती. त्यानुसार यंदा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र काही अडचणींमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढच्या वर्षी ढकलण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

या चित्रपटाविषयी अभिनेत्री कॅटरिना कैफ म्हणाली कि, ‘मला नेहमीच श्रीराम सरांसोबत काम करायचे होते. थ्रिलर स्टोरी सांगण्यात ते मास्टर आहेत आणि ते दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात काम करणे म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. या चित्रपटात विजय सेतूपतीसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे’. हा चित्रपट येत्या वर्षात २०२३ मध्ये हिंदी आणि तमिळ भाषेत चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostKatrina Kaif-KaushalPoster ReleasedVijay Sethupativiral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group