Take a fresh look at your lifestyle.

लवकरच प्रभास आणि दीपिकाचा ‘हा’ चित्रपट येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘बाहुबली’ चित्रपटाने स्वतःची खास ओळख निर्माण करणारा अभिनेता प्रभास आता बॉलिवूड कलाकारांसोबतही चित्रपट करत आहे. आता अशी बातमी येत आहे की श्रद्धा कपूर, पूजा हेगडे यांच्यासोबत चित्रपट करणारा प्रभास लवकरच अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. असे म्हटले जात आहे की दीपिका पादुकोण आणि प्रभास त्यांच्या आगामी प्रोजेक्टवर एकत्र काम करू शकतात. हा चित्रपट तेलगू भाषेत असेल, ज्याला हिंदी आणि तामिळ भाषेतही डब केले जाईल.

चित्रपटाचे नाव आणि इतर कलाकारांविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. दीपिका आणि प्रभासचा हा चित्रपट जर सिनेसृष्टीत आला तर हे दोघे एकत्र पडद्यावर झळकण्याची ही पहिलीच वेळ असेल. असे सांगितले जात आहे की चित्रपट निर्माते लवकरच संबंधित माहिती अधिकृतपणे जाहीर करतील. दिग्दर्शक नाग अश्विन दिग्दर्शित हा विज्ञान कल्पित चित्रपट असू शकतो.

नुकताच प्रभासच्या राधे श्याम चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, यात तो अभिनेत्री पूजा हेगडेसोबत रोमांस करताना दिसत आहे. प्रभास या चित्रपटात ज्योतिषीची भूमिका साकारत आहे.

Comments are closed.