Take a fresh look at your lifestyle.

‘नैना चंद्रापूरकरला भावली चंद्रमुखी’; प्राजक्ता माळीकडून अमृतावर कौतुकाचा वर्षाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शुक्रवार दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित आहे. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाच्या पोस्टर आणि गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यात चंद्रमुखीचे हटके प्रमोशन बॉलिवूड सिनेमांनाही लाजवेल असे होते. या चित्रपटात चंद्र या मुख्य भूमिकेत अभिनेत्री अमृता खानविलकर दिसते आहे. या भूमिकेसाठी अमृताने घेतलेली मेहनत तिच्या अभिनयातून आणि नजाकतींमधून स्पष्ट दिसून येतेय. तर ‘नैना चंद्रापूरकर’च्या भूमिकेत प्राजक्ता माळी दिसतेय. दरम्यान नैना चंद्रपूरकरला चंद्रमुखी भारी भावली आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट करीत अमृताचे कौतुक केले आहे.

‘चंद्रमुखी’ या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणजे ‘चंद्रा’ आणि प्राजक्ता म्हणजेच ‘नैना’ अशा या दोन पात्रांमधून त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. दरम्यान या दोघींचीही सवाल जवाबाची लावणी सध्या भयंकर चर्चेत आहे. गेल्या अनेक काळानंतर अशी सवाल जवाबाची ठसकेबाज लावणी या चित्रपटात आली आहे.

दरम्यान शुक्रवारी २९ एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्या आणि कौतुकाची दाद मिळवत अनेक थिएटर्स दुमदुमल्याचे दिसून आले आहे. दरम्यान अमृताने चंद्रा वठवण्यासाठी घेतलेली मेहनत खरोखरीच वाखाडण्याजोगी आहे. म्हणून प्राजक्ताने खास पोस्ट शेअर करीत तिचे कौतुक केले आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंट वरून हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने अमृता खानविलकरचे विशेष कौतुक करीत लिहिले आहे कि, “चंद्रमुखी प्रिमियर, अम्मो.. अमृता खानविलकर तुझ्या आयुष्यातला हा पहिला मुख्य भूमिका असलेला चित्रपट आणि तू त्यात अप्रतिम काम केलं आहेस. तुझा हा कधीच न पाहिलेला अवतार. यासोबतच तू आता एक बेन्चमार्क सेट केलं आहेस की, चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आपण किती मेहनत केली पाहिजे. तुझ्या धावपळीला साष्टांग दंडवत प्रणाम, चंद्रमुखीवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा धो धो वर्षाव होवो ह्याच शुभेच्छा…”. या पोस्टसह प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या साडीतील ‘चंद्रमुखी’च्या प्रीमियरचा खास फोटो शेअर केला आहे.