Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा झाली ट्रोल; कॅप्शन देताना केली मोठी चूक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आजकाल सारखीच ट्रोल होताना दिसते. कधी कुणाला पाठिंबा दिला म्हणून तर कधी युनिक ड्रेसिंग केलं म्हणून तिला नेटकरी ट्रोल करतात. यावेळी ती पुन्हा एकदा चांगलीच ट्रोल होताना दिसतेय आणि याच कारण ठरलाय तिच्या नव्या कोऱ्या फोटोवरील कॅप्शन. होय कॅप्शन. तिने सवयीप्रमाणे आपल्या सोशल मीडिया फेसबुकवर स्वतःचा अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला आहे. यासोबत तिने एक कॅप्शनही दिले आहे पण यातील चूक तिच्या लक्षात येण्याआधी नेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे. मग काय..? झाली ट्रोल.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. यात तिने स्वतःच अत्यंत मोहक असा फोटो शेअर केला आहे. सोबत तिने मराठी कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेतील दोन ओळी कॅप्शन म्हणून लिहिल्या आहेत. पण चुकलं इथे कि तिने कॅप्शनमध्ये शांता शेळके नाही तर शांती शेळके असे लिहिले आहे. तिने कॅप्शन लिहिताना लिहिले,
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा..
ऋतू हिरवा, ऋतू बरवा…
– शांती शेळके.
आता अशी पोस्ट प्राजक्ताने केल्यानंतर तिला ट्रोल करण्याची संधी नेटकरी कसली सोडतायत. अगदी जात्यात दळण भरडावं तस नेटकऱ्यांनी प्राजक्ताला ट्रोल केले आहे.

Prajakkta Mali

अनेक नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी तिला भरभरून ट्रोल केलं आहे. एकाने लिहिलंय कि, ”नाव माहित नसेल तर लिहिण्याआधी कुणाकडून तरी खात्री करून घ्यावी. चुकीचे नाव लिहून त्यांचा अवमान करू नका”. तर आणखी एकाने प्राजक्ताला तिने राज ठाकरेंना भोंगा वादात केलेल्या समर्थनावरून ट्रोल केले आहे. त्याने लिहिलेय कि, ”भोंग्याचा गोंगाट हिच्या मस्तकात इतका भिनलाय कि सुप्रसिद्ध कवयित्रीचे नाव सुद्धा विसरली..या असल्या चुका चुकून होत नसतात. हे एक विकृत षडयंत्र”. तर आणखी एकाने लिहिले कि, ”कवयित्रीच नाव शांताबाई शेळके असे आहे. जरा आदर दाखवावा”. तर आणखी एकाने चक्क कविताच केली आहे आणि लिहिलं आहे कि,
भोंग्यांच्या गोंगाटावर
राज सभा भरवा…
राज्यपाल हस्ते पुरस्कार
मिळे मनाला गारवा…
– प्राजक्ती माळी.

एकंदरच ट्रोलिंग सीमा नसते त्यामुळे आणखी किती आणि कोण कोण कसं कसं ट्रोल करेल याची काही शाश्वती नाही. तूर्तास प्राजक्ताने आपली चूक सुधारत फेसबुक पोस्ट डिलीट केली आहे आणि इंस्टवर सुधारित पोस्ट शेअर केली आहे. पण यामुळे ट्रोलिंग थांबेल का आणखी वाढेल हे काही सांगता येत नाही.