Take a fresh look at your lifestyle.

एकदम खूष..! प्राजक्ताने आज्जी- आजोबांसोबत पाहिला ‘सरसेनापती हंबीरराव’; म्हणाली..,

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे आणि त्याच्या कलाकृतीचे भरभरून कौतुक करणे हि गोष्ट फार दुर्मिळ पहायला मिळते हा गैरसमज आहे. कारण मराठी सिनेसृष्टीत सर्रास एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचं मनापासून कौतुक करताना दिसतो. अलीकडेच गेल्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी दिग्दर्शक – लेखक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांचा ऐतिहासिक चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’ प्रदर्शित झाला. अवघ्या महाराष्ट्राने या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला आहे. इतकेच काय तर अनेक कलाकारांनी हा चित्रपट पाहिला आणि हि कलाकृती कशी अप्रतिम आहे हे आपल्या चाहत्यांना सांगितलंय. यात प्राजक्ता माळीचाही समावेश आहे. फक्त ती नाही तर तिच्या आज्जी आणि आजोबांनीही हा चित्रपट पाहिला आणि ते खुश झालेत.

आज्जी आजोबांसोबत पिच्चर पाहायला गेलेल्या प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत तरडे आणि त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले आहे. तिने लिहिलंय कि, A day with “आजी-आजोबा”. आणि आम्ही “सरसेनापती हंबीरराव” पाहिला.. कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट. प्रविण दादा @pravinvitthaltarde तू भारी आहेस- विषय कट. २.३० तासात तू दोन महाराजांची, त्यांच्या सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट; ज्या हुशारीनं दाखवलीस त्याला तोडच नाही. तुझ्यातला प्रेमळ, समंजस, दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला.. आणि त्यानी आम्हांला कितीतरी शिकवलं. त्यासाठी किती धन्यवाद देऊ? #केवळप्रेम[email protected] नेहमीप्रमाणे कडक कामगिरी[email protected] @shrumaratheमोहिम यशस्वीप्रत्येक मराठी माणसानं बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट. (मी पुन्हा किमान दोनदा तरी पाहणार आहे..).आजी- आजोबा एकदम खूष…#अटकेपारझेंडा #स्वराज्याचेमावळे #सह्याद्रिचीलेक #prajakttamali @

परिस्थिती जेव्हढी बिकट मराठा तेव्हढाच तिखट अशा हटके टॅगलाईनसोबत या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. यानंतर अखेर हा चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनीच लिहिले आहेत. तर दिग्दर्शनाचीही जबाबदारी त्यांनीच पेलली आहे. शिवाय या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय तर हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत प्रवीण तरडे दिसत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने बक्कळ कमाई करण्याच्या दिशेकडे झेप घेतली आहे. हा चित्रपट केवळ एक उत्तम कलाकृती नव्हे तर पुन्हा पुन्हा पहावा असा चित्रपट असल्याची भावना दिग्दर्शक विजू माने यांनीही व्यक्त केली आहे.